PHOTO | औरंगाबादेत शिवजयंती महोत्सवाचा जल्लोष, ढोल-ताशे, लेझीम, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी शहरात नवचैतन्य!!

शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण समितीच्या वतीने विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र पारायण आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, मावळ्यांचा वेश परिधान करून हजेरी लावली होती.

PHOTO | औरंगाबादेत शिवजयंती महोत्सवाचा जल्लोष, ढोल-ताशे, लेझीम, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी शहरात नवचैतन्य!!
| Updated on: Feb 17, 2022 | 10:31 AM

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त बुधवारी शहरात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं. शिवसेनेच्या (Aurangabad Shiv Sena) वतीने शहरात शिवजागर महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी अभिषेक, वक्तृत्व स्पर्धांसह शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौक (Kranti Chauk) येथे शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी लेझीम, ढोल पथक, झांज पथकासह मोठ्या दणक्यात शिवरायांचा जयघोष करत उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण समितीच्या वतीने विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र पारायण आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, मावळ्यांचा वेश परिधान करून हजेरी लावली होती.

बुधवारी शिवसेनेच्या वतीने औरंगाबादच्या क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली. यावेळी सर्वच नेत्यांची उपस्थिती होती.

बुधवारी ढोल पथकाचे सादरीकरण सुरु असताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांना या ढोल वाजवण्याचा मोह अनावर झाला आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदवला. यावेळी शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले.

शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण समितीच्या वतीने विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र पारायण आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, मावळ्यांचा वेश परिधान करून हजेरी लावली होती.

शिवजयंतीच्या निमित्ताने शहराच्या विविध भागांतील शिवसेना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मशाली हाती घेत यात्रा काढली. यातील पश्चिम महिला आघाडी मशाल यात्रेचे हे छायाचित्र.

शिवजयंतीच्या निमित्ताने औरंगाबादेत शिवजागर आयोजित करण्यात आला.

इतर बातम्या-

Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला; कोरोनामुळं बालविवाह वाढताहेत?

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका वादाच्या भोव-यात, कोणी केलाय विरोध ?, काय आहे कारण?