Aurangabad | पवित्र रमजान महिन्याची शहरात लगबग, औरंगाबादचा ऐतिहासिक सायरन वाजणार की नाही?

| Updated on: Mar 29, 2022 | 6:00 AM

मागील काही वर्षांपासून या ऐतिहासिक टॉवरची पडझड होत होती. त्यामुळे स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी क्लॉक टॉवरला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला. 100 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने बांधकाम झाले, ज्या साहित्याचा वापर झाला, तसेच साहित्य वापरून नूतनीकरण करण्यात आले.

Aurangabad | पवित्र रमजान महिन्याची शहरात लगबग, औरंगाबादचा ऐतिहासिक सायरन वाजणार की नाही?
औरंगाबादमधील ऐतिहासिक टॉवर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः येत्या 3 एप्रिलपासून पवित्र रमजान (Ramdan month) महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरात मुस्लिम भाविक आणि संघटनांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या रमजान महिन्यापूर्वी शहरातील शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ्याची (historical colck) दुरुस्ती करण्याची योजना महापालिकेनी (municipal corporation) आखली होती. कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या या घड्याळाच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ मिळत नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील एका कंपनीने हे घड्याळ दुरुस्त करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे रमजानच्या पूर्वी हे घड्याळ दुरुस्त केले जाईल, असे स्मार्ट सिटीच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता रमजान महिना काही दिवसांवर येऊन ठेपलाय, तरीही घड्याळाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीही रमजान महिन्यात ऐतिहासिक क्लॉक टॉवरवरून सायरन वाजण्याची शक्यता कमीच आहे, असे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात येत आहे.

निझाम काळातील क्लॉक टॉवर

निझाम राजवटीतील शेवटचे निझाम आसिफ जबाँ मबेबूब अली खान यांनी निझाम राजवटीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंज मिशदीसमोर भव्य क्लॉक टॉवर बांधम्याचा निर्णय घेतला होता. 3 मे 1901 मध्ये टॉवरच्या बांधकामास सुरुवात झाली. 30 ऑक्टोबर 1906 रोजी हे काम संपले. 10 ऑक्टोबर 2021 रोजी टॉवर उभारणीला 115 वर्षे पूर्ण झाली. या टॉवरचे वैशिष्ट्य म्हणजे उंच असलेले घड्याळ दर तासाला घंटा वाजवत असायचे या घंटेचे नाद जुन्या औरंगाबाद शहरातील सर्व परिसरात स्पष्टपणे ऐकू येत होते. रमजान महिन्यात सकाळी चार आणि संध्याकाळी पावणे सातच्या वेळी या टॉवरवरील सायरनदेखील वाजवले जात. मात्र 2003 मध्ये हे सायरन आणि घड्याळ बंद पडले होते.

टॉवरचे नूतनीकरण, मात्र घड्याळ नादुरुस्तच

मागील काही वर्षांपासून या ऐतिहासिक टॉवरची पडझड होत होती. त्यामुळे स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी क्लॉक टॉवरला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला. 100 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने बांधकाम झाले, ज्या साहित्याचा वापर झाला, तसेच साहित्य वापरून नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे टॉवर आता आकर्षक दिसत आहे. फेब्रुवारी 2021 मध्येच टॉवरच्या नूतनीकरणाचे काम संपले. क्लॉक टॉवरवरील घड्याळ दुरुस्त करण्यासाठी हैदराबाद येथील तंत्रज्ञांनी तयारी दर्शवली होती. साडेतीन लाख रुपये खर्च करून लवकरच हे काम करण्यात येणार असल्याचे स्मार्ट सिटीने सांगितले होते. मात्र रमजान महिन्यापूर्वी या कामाला मुहूर्त लागण्याची चिन्हे कमी आहेत, असेच दिसतेय.

इतर बातम्या-

खारेगाव, कळवा परिसरातील सुशोभिकरण, साफसफाई, कळवा खाडी पूल कामाची आयुक्तांकडून पाहणी

Bengal: पश्चिम बंगालच्या विधानसभेत राडा, एकमेकांना मारहाण, कपडेही फाडले, आमदार रुग्णालयात, नेमकं काय घडलं?