औरंगाबादमधील द जैन इंटरनॅशनल स्कूलचे नाव ब्लॅकलीस्टमध्ये, शिक्षण विभागाची कारवाई, काय आहे कारण?

| Updated on: Jan 21, 2022 | 9:37 AM

आरटीईच्या नियमांची अंमलबजावणी न करता वह्या, पुस्तके, लेखन साहित्याची विक्री करत शाळेतच दुकानदारी सुरु केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील द जैन इंटरनॅशनल स्कूलचे नाव ब्लॅकलीस्टमध्ये, शिक्षण विभागाची कारवाई, काय आहे कारण?
द जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाई
Follow us on

औरंगाबादः शहरातील शहानूरमियाँ दर्गा परिसरातील द जैन इंटरनॅशनल (The Jain International School) शाळेला शिक्षण विभागाने ब्लॅक लीस्टमध्ये टाकले आहे. आरटीईच्या नियमांची अंमलबजावणी न करता वह्या, पुस्तके, लेखन साहित्याची विक्री करत शाळेतच दुकानदारी सुरु केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील ही शाळा चर्चेत आली होती. शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड आणि शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे रेड कार्ड देण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या या भेदभावावरून पालकवर्गाने प्रचंड संताप व्यक्त केला होता. आता आरटीईच्या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.

का झाली कारवाई?

द जैन इंटरनॅशनल स्कूलने शाळेच्या आवारात पुस्तके, लेखन साहित्य विक्री केल्याची तक्रार अमित निर्मलकुमार कासलीवाल व इतर तीन पालकांनी जिल्हा बालहक्क परिषद आणि शिक्षण विभागाकडे केली होती. शिक्षण विभागाने सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तक्रार कर्त्या पालकांचे विद्यार्थी इयत्ता पहिली वर्गात असल्याचे आढळून आले होते. त्यांना शाळेत पुस्तके खरेदीसाठी 4 हजार 700 रुपये भरल्याची पावती दिली होती. दिलेली पावती व प्रत्यक्ष घेतलेली रक्कम यात 1,417 रुपयांचा फरक होता. पालकांकडून घेतलेली रक्कम जास्त असल्याचे निदर्शनास आले.

पालकांकडून साहित्यासाठी अतिरिक्त पैसे

शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या पावतीवर कुठल्याही प्रकारचा जीएसटी क्रमांक नमूद करण्यात आला नसल्याचे चौकशी समितीला आढळून आले होते. त्यानुसार, शिक्षण उपसंचालक विभागाने 11 जून 2004 च्या शासन निर्णयानुसार, शाळेविरुद्ध कारवाई करून काळ्या यादीत नाव समाविष्ट केल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली.

इतर बातम्या-

भारतीय कृषी उत्पादनांचा आंतरराष्ट्रीय बाजारात वाजणार डंका, अर्थसंकल्पात खास धोरण; मालाचे विदेशात ब्रँडिंग

VIDEO | कोरोनाच्या संकटामुळं, नागपूरमधील तरुणाईचा कोर्ट मॅरेजकडे कल वाढला

A