1 हजार कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप, आता सुरेश धस म्हणतात, कोर्टात बघू!

| Updated on: Dec 21, 2021 | 1:16 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर एक हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे.

1 हजार कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप, आता सुरेश धस म्हणतात, कोर्टात बघू!
suresh dhas
Follow us on

आष्टी: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर एक हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. माझी संपत्ती चार कोटीची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल असं सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट सुरेश धस यांच्यावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. त्याला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. एक हजार कोटीच्या घोटाळ्याचे मलिक आकडे सांगत आहेत. माझी स्वत:ची प्रॉपर्टी चार कोटी रुपयांची आहे. माझी सर्व मालमत्ता मलिकांना देतो. मला पाच पन्नास द्या. माझ्यावरील कर्जपाणी फिटून जाईल. एक हजार वगैरे… आणि ईडी… एवढ्या लांब आम्हा छोट्या माणसाला कशाला नेऊन घालता हो. काहीही बोलायचं… कुठला तरी माणूस माहिती देतो त्याच्या आधारावर जबाबदार मंत्र्याने बोलावं यापेक्षा मोठं दुर्देव नाही. मलिकांना या पूर्वी अशाच बेताल आरोपांप्रकरणी माफी मागावी लागली आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करणं दुर्देव आहे. राजकारणात कोणाच्याही इज्जत घ्यायच्या आणि काहीही बोलायचं यापेक्षा दुसरं काही म्हणता येणार नाही, असं धस म्हणाले.

मलिकांकडे काय पुरावे आहेत?

मलिकांकडे कुठे पुरावे आहे? काय आहे? कशाचं हडप हडप? काय काय काय असे जे शब्द तुम्ही वापरताय त्याला काही तरी अर्थ असला पाहिजे. रेकॉर्ड आहे का? कालपर्यंत ते माझं नावही घेत नव्हते. आज नाव घेतलं का? नाव घेतलं तर त्याला अब्रुनुकसानीच्या दाव्यातून उत्तर देता येईल. मला त्यांच्यावर दावा करावा लागेल, असं ते म्हणाले.

कल्पोकल्पित आरोप

कोण शेळके? कोण अगाव? कोणती प्रकरणं? याची नीटनेटकी माहिती न घेता विनाकारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून मंत्र्याने आरोप करणं गैर आहे. सामन्य माणूस बोलला… आरटीआय टाकणारे बोलले त्यांचं ठिक होतं. पण मलिक बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. याचं आश्चर्य वाटतं. त्यांची ख्यातीच त्याबाबत आहे. ते कुणावरही आरोप करतात. कुणाचा फोटो कुठे पाहिले की लगेच संबंध लावून मोकळे होतात. असं थोडीच असतं? कोणती कागदपत्रं आहेत? त्यावर नाव आहे का गाव आहे का? काही आहे का? कसलंही काही नसताना कपोलकल्पित काही तरी बोलणं हेच याला म्हणता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

देवस्थानाच्या जमिनी हडपल्या, भाजपच्या सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; नवाब मलिकांचे आरोप काय?

Central Godavari | नाशिकच्या सेंट्रल गोदावरी संस्थेवर माजी खासदारांची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून आपला पॅनल विजयी

चार मांजरी, मिनी कूपर गाडी, महागडी ज्वेलरी, जॅकलिन फर्नांडीस सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात अडकली तरी कशी?