AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Godavari | नाशिकच्या सेंट्रल गोदावरी संस्थेवर माजी खासदारांची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून आपला पॅनल विजयी

नाशिक तालुक्यातील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था महत्त्वाची समजली जाते. तब्बल 27 गावांमध्ये या संस्थेचे जाळे पसरले आहे. संस्थेचे एकूण सभासद 3402 आहेत.

Central Godavari | नाशिकच्या सेंट्रल गोदावरी संस्थेवर माजी खासदारांची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून आपला पॅनल विजयी
नाशिक तालुक्यातील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आपला पॅनल विजयी झाले.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 21, 2021 | 12:34 PM
Share

नाशिकः जिल्ह्यातील महत्त्वाच्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार आणि बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या आपला पॅनलने एकतर्फी विजय मिळवत संस्था आपल्या ताब्यात ठेवली. आपला पॅनलने शेतकरी विकास पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

27 गावांमध्ये संस्थेचे जाळे

नाशिक तालुक्यातील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था महत्त्वाची समजली जाते. तब्बल 27 गावांमध्ये या संस्थेचे जाळे पसरले आहे. संस्थेचे एकूण सभासद 3402 आहेत. संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झडल्या होत्या. ही निवडणूक चुरशीची होणार असा कयास बांधला जात होता. मात्र, आपला पॅनलने संस्थेवर आपली पकड मजबूत करून पुन्हा सत्ता मिळण्यात बाजी मारली.

अशी झाली निवडणूक

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली. यातील 9 जागांवर माजी खासदार आणि बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या आपला पॅनलचे उमेदवार निवडूण आले. त्यांनी शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवला. या पॅनलचे दिनकर पाटील हे एकमेव उमदेवार विजयी झाले. या निवडणुकीत शेतकरी मोठ्या गटातील 4 जागा यापूर्वीच बिनविरोध निघाल्या आहेत. त्यात आपला पॅनलचे देविदास पिंगळे, दौलत पाटील यांची निवड झाली आहे. तर शेतकरी विकास पॅनलचे बाळासाहेब थेटे आणि बाळासाहेब वायचळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तर अनिल काकड यांचीही बिनविरोध निवड झाली.

कर्जदार लहान गट

कर्जदार लहान गटातील 6 जागांसाठी खरी लढत झाली. यात शेतकरी विकास पॅनलचे दिनकर पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले. आपला पॅनलचे प्रदीप कडलग, पंडितराव कातड-पाटील, भाऊसाहेब खांडबहाले, दत्तात्रय थेटे, श्रीनाथ थेटे हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटातून विष्णू म्हैसधुने, महिला राखीवमधून अनिता दाते, शांताबाई पाटील विजयी झाल्या. अनुसूचित जाती-जमाती गटातून रमेश डंबाळे हे विजयी झाले.

मतदारांना भूलथापा दिल्या

विजयानंतर प्रतिक्रिया देताना माजी खासदार आणि आपला पॅनलचे देविदास पिंगळे म्हणाले की, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेची पचवार्षिक निवडणूक एकतर्फी झाली. या निवडणुकीत दिनकर पाटील, शिवाजी चुंभले यांनी मतदारांना भूलथापा द्यायचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांनी संस्थेचे हित पाहिले. आमच्या पारड्यात कौल दिला. यापुढेही शेतकरी आणि संस्थेच्या सभासदांचे हित जपू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

इतर बातम्याः

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध; विनायक राऊतांकडून गंभीर आरोप

VIDEO: नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप