बगीचा नव्हे, ही तर हिरवाईने नटलेली स्मशानभूमी, औरंगाबादमधील कन्नड नगरपरिषदेची निर्मिती!

| Updated on: Dec 02, 2021 | 5:23 PM

कन्नड नगरपरिषदेने विकसित केलेल्या या स्मशानभूमी म्हणजे एक हिरवागार बगीचाच आहे. अत्यंत सुबक आणि सुंदर पद्धतीचं इथलं बांधकाम आहे. याठिकाणी अत्युच्च दर्जाची हिरवळदेखील तयार करण्यात आली आहे.

बगीचा नव्हे, ही तर हिरवाईने नटलेली स्मशानभूमी, औरंगाबादमधील कन्नड नगरपरिषदेची निर्मिती!
कन्नड येथील अद्ययावत स्मशानभूमी
Follow us on

औरंगाबादः स्मशानभूमी म्हटलं की उजाड, भयाण वाटणारी जागा, असं चित्र कुणाच्या मनात उभं राहतं. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात अशी एक स्मशानभूमी उभारण्यात आली आहे, जी कुणालाही हवी हवीशी वाटेल. कन्नड नगरपरिषदेने तयार केलेली ही स्मशानभूमीच काही वेगळ्या प्रकारची आहे. इथली हिरवाई, सुंदर बगीचा आणि अंत्यविधीसाठीच्या सोयी पाहून स्मशानभूमीबद्दलचं तुमचंही मत बदलल्याशिवाय राहणार नाही.

देशी-विदेशी प्रजातींची असंख्य झाडे

कन्नड नगरपरिषदेने विकसित केलेल्या या स्मशानभूमी म्हणजे एक हिरवागार बगीचाच आहे. अत्यंत सुबक आणि सुंदर पद्धतीचं इथलं बांधकाम आहे. याठिकाणी अत्युच्च दर्जाची हिरवळदेखील तयार करण्यात आली आहे. तसेच परिसरात देशी-विदेशी प्रजातींची असंख्य झाडेही लावण्यात आली आहे. धर्मशास्त्रानुसार अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टींच्या सुविधा स्मशानभूमीत करण्यात आलेल्या आहेत. स्मशानभूमीत प्रथमच ग्रॅनाईट मार्बलचा वापर करण्यात आला आहे.

अंत्यविधीसाठीच्या सर्व सुविधा अद्ययावत

कन्नड येथील या स्मशानभूमीत अस्थी लॉकर, दशक्रिया विधी हॉल, अंघोळीसाठी, हात पाय धुण्यासाठी व्यवस्था, किर्तन भजनासाठी हॉल, अंत्यविधीसाठी आलेला लोकांना बसण्यासाठी स्टेडियमच्या स्वरूपाची तयार करण्यात आलेली आहे. कन्नड नगरपरिषदेने विकसित केलेली ही स्मशानभूमी सध्या एक प्रेक्षणीय स्थळ बनत आहे. स्मशानात आपल्या माणसाचा देह सोडण्यासाठी गेलेल्या नातेवाईक, आप्तेष्ठांना प्रसन्न वाटेल, याची पूर्ण काळजी इथे घेण्यात आली आहे.

इतर बातम्या-

नशीबच पालटलं! IIT च्या विद्यार्थ्याला उबरकडून थेट 2 कोटींपेक्षा जास्त पगाराची ऑफर

ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; भाजप नेते आशिष शेलारांची घणाघाती टीका