CORONA: औरंगाबादेत परदेशातून आलेल्या 20 जणांची आज कोरोना चाचणी, काल दोघांचे अहवाल निगेटीव्ह!

| Updated on: Dec 02, 2021 | 10:43 AM

ओमिक्रॉन या कोरोनाच्या घातक विषाणूचा भारतात फैलाव होऊ नये म्हणून विदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार आज 20 जणांची तपासणी केली जाणार आहे.

CORONA: औरंगाबादेत परदेशातून आलेल्या 20 जणांची आज कोरोना चाचणी, काल दोघांचे अहवाल निगेटीव्ह!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे (Omicron varient) संकट देशावर घोंगावत असताना राज्य शासन तसेच स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. औरंगाबादमध्येही नव्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसात विदेशातून शहरात आलेल्या 31 नागरिकांची यादी मनपाला मिळाली. त्यापैकी 20 जणांची कोरोना चाचणी (Corona test) गुरुवारी 2 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. उर्वरीत 11 जणांमध्ये दोघे विदेशातील रहिवासी, दोघे मुंबई आणि इतर ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान तिसख्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा 40 टक्के रुग्ण अधिक असतील, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असून त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

2 विदेशींची चाचणी निगेटिव्ह

विदेशातून शहरात आलेल्या दोन नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी काल बुधवारी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. सध्या हे नागरिक दिल्लीला गेले असून तेथेही त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

विभागीय आयुक्तांनी काय दिल्या सूचना?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रुग्णालयांचे स्ट्रक्चरल, फायर ऑडिट करून घ्या. आयसीयू वॉर्डांना स्वतंत्र वीज जोडणी द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाला केल्या आहेत. तसेच दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता ऑक्सिजन सिलिंडर भरलेले आहेत की नाही, हे तपासून घ्यावे. ऑक्सिजन प्लँटला विजेची समस्या उद्भवू नये, यासाठी एक्सप्रेस फीडरवरून जोडणी द्यावी, व्हेंटिलेटरची तपासणी करावी आणि विशेष म्हणजे कोरोना तपासण्या वाढवाव्यात अशा सूचना केंद्रकर यांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या-

omicron : महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत नियमांचे काटेकोर पालन करा, आदित्य ठाकरेंचे आदेश

VIDEO: ममता बॅनर्जी पवारांसमोरच म्हणाल्या, यूपीए आहे कुठे?; ममतादीदींनी काँग्रेस नेतृत्व नाकारलं?