ओमिक्रॉनचा धोका वाढला? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक

केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या. याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे.

मुंबई : ओमिक्रॉनमुळे (Omicron) देशभरात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं आणखी एक वृत्त येऊन धडकलं आहे. कारण हाय रिस्क (High Risk Countries) देशातून आलेले 6 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती केंद्र सरकारनं प्रसारीत केलीय. ह्या सर्वांची ओमिक्रॉन चाचणीही करण्यात आलीय. त्याच्या अहवालाची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या. याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI