Aurangabad: बनावट ई-मेल आयडी स्टील कंपनीच्या संचालकांची फसवणूक, 36 लाखांचा गंडा

| Updated on: Nov 24, 2021 | 12:01 PM

भामट्यांनी बनावट ईमेल आयडीद्वारे बँकेत संपर्क साधून सहा जणांच्या नावावर संचालकांच्या खात्यातून रक्कम वळती केली. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकाशी संवाद साधत त्याने विश्वासही संपादन केला. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad: बनावट ई-मेल आयडी स्टील कंपनीच्या संचालकांची फसवणूक, 36 लाखांचा गंडा
सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा
Follow us on

औरंगाबादः बनावट ई-मेल आयडी तयार करून एका स्टील कंपनीच्या संचालकांनाच फसवल्याचे प्रकरण (Cyber crime) औरंगाबादमध्ये उघडकीस आले आहे. या मेल आयडीद्वारे आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या (Fake E mail ID) संचालकांना तब्बल 36 लाख 12 हजार रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. 22 रोजी सिडकोतील पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) शाखेच्या खात्यातून हे पैसे गायब झाले. सायबर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. एल. स्टील्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक नितीन गुप्ता यांच्या नावाने भामट्याने बनावट ई-मेल आयडी तयार केला. या मेल आयडीवरून पंजाब नॅशनल बँकेत ईमेल पाठवला. मोबाइलवर बँकेच्या व्यवस्थापकास नितीन गुप्ता बोलत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. व्यावस्थापकाला बोलण्यात गुंतवून रंजित कुमार गिरी, मनोज कुमार, परशुनदास आणि शंकर जैन यांच्या बँक खात्यावर 36 लाख 12 हजार 287 रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्यास भाग पाडले.

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हा प्रकार लक्षात आल्यानंतर आर. एल. स्टील अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक विवेक प्रभाकरराव घारे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांना बनावट ई-मेल आयडी तयार करून तसेच आरटीजीएसद्वारे अपहार करणाऱ्या सहा जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गौतम पातारे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

इतर बातम्या-

नेतृत्व करण्यासाठीच या 4 राशी जन्माला येतात, काही क्षणातच लोकांचे मन जिंकून घेतात

परभणीत राष्ट्रवादीला धक्का; जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा, नेमके कारण गुलदस्त्यात