Property Tax: मुंबईप्रमाणे करात कपात मिळाल्यास औरंगाबादेत किती मालमत्तांना होणार फायदा?

| Updated on: Jan 06, 2022 | 7:10 AM

मुंबईत 500 चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांना कर सवलत देण्यात आली आहे. याच धर्तीवर औरंगाबादेतही निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरतेय. पण याचा किती घरांना फायदा होईल, हाही प्रश्न आहेच.

Property Tax: मुंबईप्रमाणे करात कपात मिळाल्यास औरंगाबादेत किती मालमत्तांना होणार फायदा?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः मुंबईतील 500 चौरस फूट मालमत्ताधारकांना मालमत्ता कर माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादेतही निर्णय घेतला जावा, अशी मागणी जोर धरतेय. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील राज्यातील सर्वच शहरांमध्ये हळू हळू हा निर्णय लागू होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र खरंच हा निर्णय औरंगाबाद शहरात लागू झाला तर फक्त अंदाजे पन्नास हजार मालमत्तांनाच याचा फायदा होईल, अशी माहिती समोर येत आहे. दैनिक सकाळमध्ये प्रकाशित वृत्तात महापालिका उपायुक्त तथा कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

गुंठेवारीच्या मालमत्तांना फायदा होणार का?

500 चौरस फुटांवरील मालमत्तांचा निर्णय औरंगाबाद शहरात लागू झाल्यास गुंठेवारीच्या मालमत्तांना त्याचा लाभ मिळणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. गुंठेवारी भागातील मालमत्ता 600 चौरस फुटांवर आहेत. अनेकांनी या जागेवर टोलेगंज इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे बांधकामाचे क्षेत्रफळ कितीतरी पटींनी जास्त आहे. म्हणूनच बहुतांश गुंठेवारीच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.

महापालिकेला किती रुपयांचा फटका बसणार?

दरम्यान, शहरात नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मालमत्तांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यानंतरच 500 चौरस फुटात किती मालमत्ता आहेत, त्यावरील बांधकाम किती आहे, यासंदर्भातील माहिती पुढे येईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. तरीही नगर रचना विभागाने शहरात 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सुमारे 50,000 मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या विचार करता, मुंबईप्रमाणे औरंगाबादला 500 चौरस फुटांसदर्भातला निर्णय लागू झाल्यास महापालिकेच्या तिजोरीला किमान पाच कोटींचा फटका बसू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या-

Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!

IND vs SA: ‘अर्धवट माहिती असेल, तर तुझं…’, भर मैदानात ऋषभ पंतचा रेसी वान डर डुसें बरोबर राडा