IND vs SA: ‘अर्धवट माहिती असेल, तर तुझं…’, भर मैदानात ऋषभ पंतचा रेसी वान डर डुसें बरोबर राडा

IND vs SA: 'अर्धवट माहिती असेल, तर तुझं...', भर मैदानात ऋषभ पंतचा रेसी वान डर डुसें बरोबर राडा

38 वे षटक संपल्यानंतर रेसी वान डर डुसें ऋषभच्या कानाजवळ गेला व त्याने काल पकडलेल्या वादग्रस्त कॅचबद्दल काहीतरी बरळला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 5:32 PM

जोहान्सबर्ग: स्टेडियममध्ये प्रेक्षक नसल्यामुळे मैदानावर खेळाडूंमध्ये घडणारा संवाद स्टंम्पच्या मायक्रोफोनमधून सर्वांना समजतोय. आजही असचं घडलं. कोविड-19 रुग्णांची संख्या वाढल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे मैदानावर खेळाडू आणि पंचांमध्ये घडणारा संवाद प्रेक्षकांना समजतोय. (India vs South Africa ‘If you have half knowledge, then keep your mouth shut’ Pant to van der Dussen)

मायक्रोफोनमुळे समजली बाचाबाची
लोकेश राहुलला पंचांनी दिलेली वॉर्निंग असो किंवा अश्विनने मैदानावरच शार्दुलला विचारलेला प्रश्न हे सर्व स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे प्रेक्षकांना समजलं. आजही कसोटीच्या तिसऱ्यादिवशी मैदानावर ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या रेसी वान डर डुसें यांच्यामधली शाब्दीक बाचाबाची मायक्रोफोनमुळे समजली.

डुसें ऋषभला काय बोलला?
38 वे षटक संपल्यानंतर रेसी वान डर डुसें ऋषभच्या कानाजवळ गेला व त्याने काल पकडलेल्या वादग्रस्त कॅचबद्दल काहीतरी बरळला. त्यावर पंतने ‘तुझ्याकडे अर्धवट माहिती असेल, तर तोंड बंद ठेव’ असं त्याला सुनावलं. स्टेडियमवर प्रेक्षकांची उपस्थिती असताना, स्टंम्पचे मायक्रोफोन असले, तरी खेळाडूंमध्ये मैदानावर घडणारा संवाद समजत नाही.

कुठल्या कॅचवरुन झाला वाद
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर रेसी वान डर डुसाची कॅच ऋषभ पंतने (Rishabh pant) घेतली. पंचाने त्याला आऊट दिले. पण रिप्लेमध्ये रेसी वान डर डुसा नॉटआऊट असल्याचं दिसत होतं. 45 व्य़ा षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुलच्या गोलंदाजीवर आत येणार चेंडू रेसी वान डर डुसाच्या बॅटची कड घेऊन थायपॅडला लागला. त्यानंतर चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पंच इरास्मस यांनी दुसांला आऊट दिले. पण रिप्लेमध्ये चेंडूने ग्लोव्हजमध्ये विसावण्याआधी जमिनीला स्पर्श केल्याचे दिसले. कॉमेंट्री करणाऱ्यांनाही दुसा नॉटआऊट असल्याचे वाटले.

संबंधित बातम्या: 

IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार
Ajinkya Rahane| करीअर संकटात सापडल्यानंतर रहाणे आणि पुजाराची बॅट तळपली
Rishabh Pant| ‘नॅचरल खेळ वैगेर बकवास बंद करा’, गावस्कर ऋषभ पंतवर भडकले

(India vs South Africa ‘If you have half knowledge, then keep your mouth shut’ Pant to van der Dussen)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें