औरंगाबादः कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, नव्या वर्षात 10 समित्यांच्या निवडणुका

| Updated on: Oct 25, 2021 | 5:43 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी 17 जानेवारी 2022 रोजी निवडणूक होणार आहे. तर सिल्लोड-कन्नड बाजार समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठीची मतमोजणी अनुक्रमे 18 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

औरंगाबादः कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, नव्या वर्षात 10 समित्यांच्या निवडणुका
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (APMC) निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या दहा पैकी पहिल्या टप्प्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad APMC) आठ बाजार समित्यांसाठी 17 जानेवारी 2022 रोजी निवडणूक होणार आहे. तर सिल्लोड-कन्नड बाजार समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठीची मतमोजणी अनुक्रमे 18 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात कोणत्या बाजारपेठा?

पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, पैठण, वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री या बाजार समित्यांसाठी 17 जानेवारी रोजी निवडणूक होईल. तर दुसऱ्या टप्प्यात सिल्लोड आणि कन्नड या बाजार समित्यांसाठी 6 फेब्रुवारी निवडणूक होईल.

अशी असेल प्रक्रिया

पहिल्या टप्प्यातील आठ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. 16 ते 22 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची विक्री व स्वीकृती होईल. 16 ते 22 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज प्रसिद्ध केले जातील. 23 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. 24 डिसेंबर ते सात जानेवारी या कालावधीत माघार घेता येईल. निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी दहा जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. 17 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

18 जागांसाठी निवडणूक

प्रत्येक बाजारसमितीमधून 18 संचालकांची निवड केली जाणार आहे. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून 11 संचालक निवडले जातील. त्यापैकी दोन जागा महिलांसाठी तर एक जागा भटक्या जमातीसाठी राखीव असेल. ग्रामपंचायत मतदारसंघातून चार संचालक निवडले जातील. यापैकी एक जागा अनुसूचित जाती, जमातीसाठी तर एक जागा महिलांसाठी राखीव असेल. याशिवाय व्यापारी मतदारसंघातून दोन, तर हमाल मापाडी मतदारसंघातून एका संचालकाची निवड केली जाईल, अशी माहिती दाबशेडे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुका 23 ऑक्टोबर 2021 पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. राज्य आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

इतर बातम्या-

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघात लवकरच निवडणूक, 2015 ची निवडणूक बिनविरोध, इच्छुक लागले कामाला!

औरंगाबाद जिल्ह्यातील ई-फेरफार 14 दिवस बंद, तलाठ्यांचा संप सुरूच, पुण्यातली तोडग्याची बैठक निष्फळ