हर्षवर्धन जाधव भडकले, औरंगाबादेत मोर्चाचे निवेदन द्यायला गेले, अधिकारी वेळेवर आलेच नाहीत..

आम्ही जनता आहोत. तुम्ही ऑफिसमध्ये बसायचे आणि मागण्या मांडण्यासाठी आलेल्या वृद्ध, निराधार महिलांनी उन्हात ताटकळत बसायचे, हे तुम्हाला शोभतं का, अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

हर्षवर्धन जाधव भडकले, औरंगाबादेत मोर्चाचे निवेदन द्यायला गेले, अधिकारी वेळेवर आलेच नाहीत..
सोयगाव तहसील अधिकाऱ्यांवर भडकले माजी आमदार हर्षवर्धन जाधव
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:21 AM

औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) सोयगाव तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. निराधार महिलांच्या पेन्शन आणि इतर सुविधांच्या मुद्द्यावरून आज त्यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील (Soygaon Tahsil) सोयगाव तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेला असता त्या ठिकाणी अधिकारी वेळेवर पोहोचलेच नाहीत. त्यामुळे वृद्ध महिलांना बराच वेळ कार्यलयाबाहेर ताटकळत बसावे लागले. निराधार महिलांना अशा प्रकारे उन्हात बसावे लागले तरीही अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ लावला.

तुम्ही ऑफिसात, वृद्ध महिला उन्हात

तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव चांगलेच भडकले. तुम्ही प्रशासकीय सेवेत आहात. नियम पाळणे तुमचे कर्तव्य आहे. आम्ही जनता आहोत. तुम्ही ऑफिसमध्ये बसायचे आणि मागण्या मांडण्यासाठी आलेल्या वृद्ध, निराधार महिलांनी उन्हात ताटकळत बसायचे, हे तुम्हाला शोभतं का, अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. निराधार महिलांना पेंशन आणि इतर सुविधा वेळेवर मिळत नसल्याने हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्त्वात सोयगावच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

कन्नड बाजार समितीत मका लिलावास सुरुवात

चालू वर्षात मका पिकाचे उत्पादन कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणार असल्याच्या अनुषंगाने कन्नड बाजार समितीमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने मका खरेदी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बाजार समितीचे सभापती प्रकाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ, व्यापारी व सचिव यांची बैठक झाली. बैठकीत सविस्तर चर्चा होऊन 22 ऑक्टोबरपासून मका लिलाव चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिलावाची वेळ सकाळच्या सत्रात 12.30 व दुपार सत्रात चार वाजता तसेच भुसार शेतमालाचा दीड वाजता ठेवण्याचा निश्चित झाले. यावेळी सभापती यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव देऊन लिलाव नियमित सुरू ठेवण्याचे आवाहन व्यापारी यांना केले.

इतर बातम्या-

मनसेचा ‘काळा दसरा’ ; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन

वीजेच्या लपंडावामुळे घरगुती उपकरणे जळाली, लासूरमध्ये महिलांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा