Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर

खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडेने आत्महत्या केल्याची आणि नंतर आई-वडिलांनीही जीव दिल्याची घटना धक्कादायक होती. आयफोनमुळे ही घटना घडल्याचे मानले जात होते, मात्र आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. कुणालच्या मावशीच्या मते, त्याला आत्महत्या करायचीच नव्हती; तो फक्त आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी गेला होता. यामुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे.

Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
Khavdya Dongar Case
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 1:16 PM

छत्रपती संभाजी नगर येथे खवड्या डोंगरावर जाऊन कुणाल चांदगुडे याने जीवन संपवलं. त्याच्यापाठोपाठ त्याच्या आईवडिलांनीही जीव दिला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. कुणालने आयफोनच्या हट्टापायी जीव दिल्याचं सांगितलं जात होतं. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. कुणाल खवड्या डोंगरावर जीव द्यायला गेला नव्हता. त्याला आत्महत्या करायचीच नव्हती, असं कुणालच्या मावशीने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नवा अँगल समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा खुलासा केला आहे. कुणाला आत्महत्या करायचीच नव्हती. आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी तो डोंगरावर गेला होता. मात्र दुर्देवाने ती घटना घडली, असं कल्याणी परडे यांचं म्हणणं आहे. माझे दाजी ड्रायव्हर होते हे आम्ही मानतो. मात्र ते गरीब नव्हते. चांगल्या घरातून ते आलेले होते. त्यांच्याकडे शेती होती. शेतीतून पैसा यायचा. आजकाल आयफोन स्वस्त आहे. सेकंड हॅन्ड घेतला तर 20-25 हजार रुपयांमध्ये येतो. कुणालला अभ्यासासाठी, क्लासेससाठी आयफोन हवा होता. तो त्यांनी घेऊन दिला होता. दीदीकडे सुद्धा आयफोन होता. त्यालाही दिला होता. एवढी मोठी गोष्ट नाही की आम्ही त्याला दीड लाखाचा मोबाईल घेऊन देऊ शकत नाही, असं कल्याणी म्हणाल्या.

वडिलांना भावनिक करायचं होतं

तिच्या हक्कासाठी जर ती सासरच्या मंडळीला बोलत असेल तर त्यात वाईट काय? कुणासोबत तिचं बोलणं होत नव्हतं. त्यामुळे तिने सोशल मीडिया माध्यम बनवलं. जमिनीचे वाद होते. पण त्या संदर्भात मला जास्त माहीत नाही. कारण मी तेव्हा लहान होते. कुणालला मरायचे नव्हतेच. त्याला फक्त त्याच्या वडिलाला वापस आणायचे होते. असे केल्याने माझे वडील भावनिक होतील आणि ते माझ्याकडे येतील असे त्याला वाटत होते, असंही त्यांनी सांगितलं.

वडिलांसोबत बोलला होता

चार-पाच दिवसा अगोदर कुणालचं वडिलांसोबत फोनवरून बोलणं झालं होतं. तेव्हा त्याने तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता? मला तुम्ही पाहिजे असे सांगितले होते. तेव्हा दाजीने त्याला माझे आई-वडील बहिणी आहेत, असं सांगितलं. पण त्याला हे कळणार कसं? कारण तो लहान होता. त्याला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या. पण त्याला समजून सांगण्याचे अजून पर्याय होते. मात्र त्यांच्या सुसंवाद नव्हता त्यामुळे हे सगळं घडलं. तेव्हापासून तो जास्त परेशान होता. मी सुद्धा त्याला समजून सांगितले होते की प्रत्येक परिवारात अशा गोष्टी होत असतात. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याचे वडील पाहिजे होते. मी असे करणार त्याने अजिबात कुणाला सांगितले नव्हते आणि तसं वाटलं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us