MahashivRatri | प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरात आठ दिवस यात्रा, जड वाहनांसाठी कोणता मार्ग सोयीस्कर?

महाशिवरात्रीनिमित्त श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ येथे मोठी यात्र भरत असते. आजपासून पुढील 7 मार्चपर्यंत ही यात्रा असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर मंदिर वेरुळ तसेच तीर्थकुंड व वेरुळ लेणी ही सर्व ठिकाणे धुळे-सोलापूर महामार्ग क्रमांक 52 लगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते.

MahashivRatri | प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरात आठ दिवस यात्रा, जड वाहनांसाठी कोणता मार्ग सोयीस्कर?
| Updated on: Mar 01, 2022 | 11:09 AM

औरंगाबादः लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरुळ (Ellora) येथील घृष्णेश्वर मंदिरात (Ghrishneshwar Temple) आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तसेच वेरुळ परिसरातून जाणाऱ्या जड वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीत काही बदल केले आहेत. वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठ दिवस यात्रा भरत असल्याने पुढील आठवडाभर औरंगाबादमधून जाणाऱ्या वाहतुकीच्या (Aurangabad traffic) मार्गात बदल केल्यास वाहने आणि प्रवाशांची गैरसोय टाळता येईल, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक मार्गातील बदल पुढीलप्रमाणे-

  • औरंगाबादहून कन्नड धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने दौलताबाद टी पॉइंट माळीवाडा-आनंद ढाबा-कसाबखेडा फाटा मार्गे वेरुळ कन्नडकडे जातील.
  • कन्नडकडून येणारी सर्व जड वाहने वेरुळ-कसाबखेडा फाटा-शरणापूर फाटा मार्गे औरंगाबादकडे येतील.
  • फुलंब्री मार्गे खुलताबादकडे येणारी सर्व वाहने औरंगाबाद मार्गे जातील.
    तरीही महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथे सुरु असलेल्या यात्रेदरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, जेणेकरून वाहतुकीची कुठल्याही प्रकारे कोंडी होणार नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

7 मार्चपर्यंत घृष्णेश्वर येथे यात्रा

महाशिवरात्रीनिमित्त श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ येथे मोठी यात्र भरत असते. आजपासून पुढील 7 मार्चपर्यंत ही यात्रा असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर मंदिर वेरुळ तसेच तीर्थकुंड व वेरुळ लेणी ही सर्व ठिकाणे धुळे-सोलापूर महामार्ग क्रमांक 52 लगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. त्यामुळले सदरचा रस्ता घाटाचा असल्याने यात्रेदरम्यान वाहनांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार मार्ग अवलंबल्यास वाहनांची कोंडी होणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी

Pune crime| फ्लॅटसाठी माहेरून पैसे न आणल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले ॲसिड