औरंगबााद महापालिका सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवर मोबाइल टॉवर उभारणार, ठराव मंजूर

शहरात लवकरच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे महसूल तर वाढेलच, शिवाय नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

औरंगबााद महापालिका सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवर मोबाइल टॉवर उभारणार, ठराव मंजूर
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 20, 2022 | 5:17 PM

औरंगाबादः शहरातील अनधिकृत मोबाइल टॉवरचे (Mobile tower) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खासगी मालमत्तांवर अत्यंत धोकादायक पद्धतीने हे टॉवर उभारले जात आहेत. संबंधित मोबाइल कंपन्यांकडून महापालिकेला जास्तीचा महसूल मिळत नाही. त्यामुळे शहरात (Aurangabad city) महापालिकेच्या आणि सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवरही आता टॉवर उभारले जातील, असा निर्णय महापालिकेने (Aurangabad municipal corporation) घेतला आहे. या संदर्भातला ठराव नुकताच प्रशासनाने मंजुर केला आहे. मार्च 2021 मध्ये मोबाइल टॉवरची कर वसुली खासगी एजन्सीमार्फत करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. कोरोना संसर्गामुळे या ठरावाची अंमलबजावणी करता आली नाही. यासंदर्भात लवकरच पुढील प्रक्रिया राबवण्याचा मानस प्रशासनाचा राहणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

काय आहे नेमकी समस्या?

शहरात 600 पेक्षा जास्त मोबाइल टॉवर आहेत. यातील 299 टॉवर अनधिकृत उभारले असल्यामुळे महापालिकेने त्यांना दुप्पट कर लावला आहे. संबंधित कंपन्या दुप्पट कर लावल्याने मनपाला एक रुपयाचाही महसूल देत नाहीत. अनेक वर्षांपासून मोबाइल कंपन्या आणि मनपा प्रशासन यांच्यात वाद सुरु आहे. टॉवर सील केल्यानंतर मोबाइल सेवा ठप्प पडते. नागरिकांकडून ओरड सुरु होते. त्यामुळे महापालिका प्रातिनिधीक स्वरुपातच कारवाई करते. तसेच मोबाइल कंपन्या ज्या खासगी मालमत्तांवर टॉवर उभारतात, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसते. टॉवर कोसळला तर आसपासच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात एक धोरणात्मक निर्णय घेतला. मोबाइल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी म हापालिका आपल्या मालकीच्या खुल्या जागा उपलब्ध करून देईल. त्याप्रमाणे विविध सोसायच्यांच्या जागा मनपाकडे हस्तांतरीत केलेल्या आहेत. त्यातील 10 टक्के जागेवर टॉवर उभारण्याची मुभा राहील, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

लवकरच पुढील प्रक्रिया राबवणार- अपर्णा थेटे

मार्च 2021 मध्ये मोबाइल टॉवरची कर वसुली खासगी एजन्सीमार्फत करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. कोरोना संसर्गामुळे या ठरावाची अंमलबजावणी करता आली नाही. यासंदर्भात लवकरच पुढील प्रक्रिया राबवण्याचा मानस प्रशासनाचा राहणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. शहरात लवकरच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे महसूल तर वाढेलच, शिवाय नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ताज महाल भेटीला! पाह खास फोटो