Ajit Pawar | अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? अजित पवार चीफ इंजिनिअरवर खवळले

Ajit Pawar | आज अजित पवार संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथल्या कारभारात अजित पवारांना गलथानपणा दिसून आला. काही अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे अजित पवार चांगलेच खवळले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

Ajit Pawar | अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? अजित पवार चीफ इंजिनिअरवर खवळले
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 9:19 AM

संभाजीनगर (संतोष जाधव) | संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार आले आहेत. मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करुन आढावा बैठकीला सुरुवात झाली. मंत्री अतुल सावे आणि संदीपान भुमरे या बैठकीला उपस्थित आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निधी खर्च झाला नसल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “पैसे मिळूनही निधी खर्च केला जात नाही, एका महिन्यात सगळा निधी खर्च करू नका, कामे व्यवस्थित करा” अशी अजित पवार यांनी सूचना केली. “पाणी पुरवठा व्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील. प्रशासकीय मान्यता इतर मान्यता लवकर घ्या, निवडणुक आचारसंहिता पुर्वी कामे सुरु करा” असं अजित पवार म्हणाले.

स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी आपण शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या वर्ग खोल्या देऊ शकलो नाही, म्हणून अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी. शाळा खोली बांधण्यासाठी दानशूर व्यक्ती, CSRची मदत घ्या असा सल्ला अजित पवारांनी दिला. पालकमंत्री यांना DV कारसाठी इनोव्हा क्रिस्ट गाडी घ्यायला निधी दिला असं अजित पवार म्हणाले. त्यावर संदीपान भुमरे म्हणाले की ‘गाडी आली मात्र मला माहिती नाही, मला अधिकाऱ्यांनी सांगितलच नाही’

‘आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का ?’

या बैठकीला Pwd विभागाचे चीफ इंजिनियर न आल्याने अजित पवार यांनी झापले. “आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का ?. बैठकीला यायला चीफ इंजिनिअर यांना अडचण होते का? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या” असे आदेश अजित पवार यांनी दिले. पडेगाव पोलिस फायरिंग रेंज व वन विभाग यांची जागा संयुक्त मोजणी करुन हद्दी कायम कराव्यात, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आदेश दिले. अजित पवार संतापले, त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. संभाजीनगर येथील नियोजन समिती सभागृहाची दुरावस्था, काही ठिकाणी फर्निचर तुटलेलं आहे. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.