Aurangabad: गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणासाठी 300 व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत, नंतर कारवाई अटळ

| Updated on: Dec 04, 2021 | 4:04 PM

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad municipal corporation) गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून याच हवा तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नियमितीकरणाकडे दुर्लक्षण करणाऱ्या 300 मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. त्यांना लवकरच नोटीसा दिल्या जाणार आहेत. 15 दिवसात मालमत्ता नियमितीकरणाची प्रक्रिया न झाल्यास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय […]

Aurangabad: गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणासाठी 300 व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत, नंतर कारवाई अटळ
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय
Follow us on

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad municipal corporation) गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून याच हवा तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नियमितीकरणाकडे दुर्लक्षण करणाऱ्या 300 मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. त्यांना लवकरच नोटीसा दिल्या जाणार आहेत. 15 दिवसात मालमत्ता नियमितीकरणाची प्रक्रिया न झाल्यास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी या मालमत्तांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

तीन महिन्यात 1100 मालमत्तांचे नियमितीकरण

मनपाने मागील तीन महिन्यांत 100 मालमत्तांचे गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण करून घेतले. तर 2400 पेक्षा जास्त संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातून महापालिकेला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या मालमत्ता नियमित होणार

राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी क्षेत्रातील मालमत्ता शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शहरातील अनेक व्यावसायिक मालमत्तांची गुंठेवारी करुन घेण्यासाठी संचिका दाखल करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.

इतर बातम्या-

सहकाऱ्यांची मस्करी तरुणाच्या जीवावर, गुदमार्गात हायप्रेशर हवा भरली, भिवंडीत तरुणाचा मृत्यू

अवकाळीच्या नुकसान खुणा : उरला-सुरलां कांदाही पाण्यात भिजला अन् दरात मार खाल्ला, 1 रुपयामध्ये 1 किलो कांदा