Aurangabad: वाळूज MIDC ला पाणी पुरणारी पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी, रस्ताही खचला

औरंगाबादमध्ये जायकवाडी धरणातून वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी प्रमुख पाइपलाइन फुटली. यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याच्या प्रेशरमुळे शेंदूरवाडा गावाजवळील रस्ता खचला.

Aurangabad: वाळूज MIDC ला पाणी पुरणारी पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी, रस्ताही खचला
वाळूज एमआयडीसीला पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 6:40 PM

औरंगाबादः जायकवाडी धरणातून वाळूज एमआयडीसीला (Waluj MIDC) पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जायकवाडी धरणातून निघालेल्या प्रमुख लाईनमध्येच हा बिघाड झाला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाइनमधून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकदेखील ठप्प झाली होती. शेंदूरवडा गावाजवळ ही पाइपलाइन फुटल्याची माहिती हाती आली आहे.

वाळूज पाटोदा औरंगाबाद रस्ता खचला

पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ताही खचला.

धरणातून वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी प्रमुख पाईप लाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी मोठ्या दाबाने रस्त्यावर आले. या पाण्याच्या प्रेशरमुळे वाळूज-पाटोदा- औरंगाबाद रस्ता खचला. या खचलेल्या रस्त्यात एक मालवाहू ट्रक अडकला. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

इतर बातम्या-

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्याता

नारायण राणेंनी सीआरझेडचं उल्लंघन केलं असेल तर बंगल्यावर कारवाई करा; सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान