Railway: नवीन वर्षापासून मराठवाड्यातून पुण्यासाठी नवी रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

| Updated on: Dec 18, 2021 | 9:40 AM

मराठवाड्यातील प्रवाशांना आता पुण्याला जाण्यासाठी नवीन वर्षात आणखी एक रेल्वे सुरु होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली.

Railway: नवीन वर्षापासून मराठवाड्यातून पुण्यासाठी नवी रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी आहे.  एक जानेवारीपासून नांदेड, जालना, औरंगाबादहून  पुण्याला जाण्यासाठी नवी रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री राबवसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस धावेल आणि नंतर ती संपूर्ण आठवडाभर धावेल, असेही सांगण्यात आले आहे. येत्या आठवड्यात संबंधित रेल्वेचे वेळापत्रक रेल्वे विभागाच्या वतीने जारी करण्यात येईल.

औरंगाबाद ते अंकाई (मनमाड)चा मार्गही मोकळा

रेल्वे राज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरीकरणासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. दक्षिण मध्य रेल्वेला शुक्रवारी दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद ते अंकाई या रेल्वेमार्गाला बायपाससह मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. मात्र परभणी ते मनमाड या 291 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण रेल्वे मंत्रालयाने गुंडाळले आहे.

औरंगाबाद ते अंकाई दुहेरीकरणाने काय फायदा?

औरंगाबादपासून अंकाईपर्यंतचा रेल्वे मार्ग दुहेरी झाल्यावर या मार्गावर अंकाई येथे बायपास होईल. यामुळे 32 किलोमीटर लांबीचा फेरा वाचेल. तसेच अंकाईला होणाऱ्या बायपासमुळे शिर्डीला जाणाऱ्या गाड्यांना 32 किमीचा फेरा वाचेल. गाड्या मनमाडला न जाता थेट अंकावरून बायपास होतील.
या मार्गावर दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच रेल्वेचा वेगही वाढेल. एकेरी मार्गावर एखादे रेल्वे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे थांबेल.

इतर बातम्या-

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?

TET Exam : कोण आहेत तुकाराम सुपे?, ओळखपत्रांमुळे बिंग फुटले; रिचेकिंगच्या नावाखाली घोटाळा