‘इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद’, संजय शिरसाट यांचा घणाघात

| Updated on: Mar 06, 2023 | 6:59 PM

शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Zalil) यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी "इम्तियाज जलील हे औरंगजेबाची औलाद आहे", असा घणाघात केला.

इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद, संजय शिरसाट यांचा घणाघात
Image Credit source: tv9
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चिथावणीखोर भाषण केल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर सडकून टीका केली आहे. “इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केलाय. “इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. यावेळी संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याची माहिती मिळत आहे.

“नाव बदलला म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला. निजामाने प्रत्येकाला उर्दू शिकावे असे सांगितले. आम्ही शिकलो, विरोध केला नाही. आता राज्य आमचं आहे. आता आम्ही जे म्हणणार तेच होणार. आता तुम्ही आमच्या तावडीत आलात. काही लोकांना पोटशूळ उठलं. आब ये शेर आया है, अरे पा** हो बिऱ्याणी खाता आणि पा** राहता. आम्ही या शहरात 22 दंगली पहिल्या आहेत. यांना आम्ही कधीही निपटून घेऊ. राजकारण गेले उडत”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“एकच सांगतो गर्व से कहो हम हिंदू है. तो म्हणतो तुमची सत्ता आहे तुम्हीच कबर हलवा. मग तू काय बायांच्या मागे जाऊन बसतो का? निजामाची औलाद असतील ते संभाजी नगरला विरोध करतील. औरंगजेब मेला कुठं आणि आला इथं निजायला. कसा आला त्याकाळात माहीत नाही. आता ओवेसी इकडे येतो बिर्याणी खातो आणि कबरीवर जातो. किती त्रास त्यापेक्षा कबर तिकडे घेऊन जा मोकळे व्हा”, असं संजय शिरसाट म्हणाले.

“अमेरिकेने लादेन मारला. त्याची कबर आहे का कुठं? बिर्याणी खाऊन उपोषण सुरुय. वातावरण कधीही बिघडू शकतं, लक्षात घ्या. आता प्रत्येकजण घरावर झेंडा लावणार हे छत्रपती संभाजीनगर. इम्तियाज जलील औरंगजेबाची औलाद आहे. कधी कुणाला मारतील याचा नेम नाही. तुम्ही कोर्टात काय जाता. तिथं मोदी बसले आहेत. चिंता करू नका. मुसलमान असो की कुणीही असो छातीवर नाचले तर आम्ही सहन करणार नाही. आता मार खाणार नाही. मारून घरी जाऊ”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी आक्रोश व्यक्त केला.