औरंगाबादः सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

| Updated on: Nov 08, 2021 | 3:40 PM

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आमि सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये हा […]

औरंगाबादः सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
सिल्लोडचे सुपुत्र योगेश सुलताने यांचे पंतप्रधानांसोबतचे फोटो व्हायरल
Follow us on

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आमि सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये हा चर्चेचा आणि अभिमानाचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर या सैनिकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र योगेश विठ्ठलराव सुलताने हे जम्मूच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहेत. सीमेवरील सैनिकांना कोणताही सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा आनंद बहुधा लुटताच येत नाही. यंदाची दिवाळीदेखील देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीर्चया सीमारेषेवर जाऊन भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात मोदी यांनी जम्मू सीमेवरील कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलताने यांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि कुटुंबासह गावकऱ्यांचा आनंदाला पारावार उरला नाही.

गावकऱ्यांसाठी संस्मरणीय दिवाळी, फटाके वाजवून आनंद साजरा

गावातील सैनिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यंदाची दिवाळी साजरी करण्याचा बहुमान मिळणे, ही बाब खरोखरच गावातील सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. ही दिवाळी आमच्या गावातील सर्व नागरिकांसाठी संस्मरणीय राहील, अशी प्रतिक्रिया लोणवाडीचे उपसरपंच कारभारी काटकर यांनी दिली.
योगेश सुलतानेचे पंतप्रधानांसोबतचे फोटो पाहून माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन सुलताने, सरपंच भाऊसाहेब सुलताने, उपसरपंच कारभारी काटकर, संजय सुलताने आदींनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

इतर बातम्या-

औरंगाबादः लेबर कॉलनीवासीय रस्त्यावर, जीव मुठीत, घरावर टांगती तलवार… 10.30 वाजता कारवाई होण्याच्या दिल्या होत्या सूचना…

औरंगाबाद महापालिका आता फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार, डिझेल, पेट्रोल वाहनांची खरेदी बंद!