Bee attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, जखमी रुग्णालयात

| Updated on: Apr 10, 2023 | 9:11 AM

त्या परिसरात आतापर्यंत आठ जणांवर हल्ला केला असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुध्दा या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे.

Bee attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, जखमी रुग्णालयात
bee attack
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सोयगाव : तालुक्यातील (soygaon) अजिंठ्याच्या (Ajanta Caves) डोंगर रांगेत ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर रविवारी पर्यटक (tourists) भटकंती करीता येत असतात. तीन पर्यटक वेताळवाडी किल्ला बघण्यासाठी किल्ल्यावर असताना, दुपारी तीन-चार वाजेच्या दरम्यान अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अशोक मोरे रा. जरंडी वय 45 वर्षे, राजेंद्र पाटील रा.जरंडी वय 43 वर्षे, मनोहर पाटणकर रा.शेंदुरणी, जि जळगाव, वय 29 वर्षे, हे तीन पर्यटक गंभीर जखमी झाले. मधमाशांनी हल्ला केल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यावेळेत आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान सोयगाव-हळदा रस्ता हा वेताळवाडी किल्ल्या लगत असल्याने भिकन मंडवे वय 45, अनिता मंडवे वय 38, प्रेरणा मंडवे वय 15 व अभिजित मंडवे वय 11 वर्षे सर्व रा. गलवाडा (एस) हे आपली गावी हळद्याकडून येत असताना या मंडवे कुटुंबावर सुध्दा मधमाशांनी हल्ला केला. प्रदीप जाधव हा धावण्याचा सराव करण्यासाठी हळदा कडे धावत असताना त्याच्यावर पण मधमाशांनी हल्ला करीत जखमी केले. या आठही जखमींना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील गाडे परिचारिका एस. ए. बोराडे यांनी उपचार केले, तर त्यांना के.जी.पाटील, निर्मलाबाई जेठे यांनी मदत केली.

हे सुद्धा वाचा

त्या परिसरात आतापर्यंत आठ जणांवर हल्ला केला असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुध्दा या घटनेची मोठी चर्चा सुरु आहे. तीन वेगळ्या-वेगळ्या घटनांमध्ये नागरिकांवर मधमाशांनी हल्या केल्यामुळे त्या परिसरात नागरिक जाण्यास घाबरत आहेत. त्याचबरोबर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पर्यटन ठिकाणी मधमाशांनी अनेकदा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.