AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयोवृध्द नागरिकांसोबत इंग्रजी भाषेत संवाद साधत आधार दिला, मग चोरट्यांनी त्यांच्याकडील…,

Crime News : आतापर्यंत वयोवृध्द नागरिकांना लुटण्याचे काम चलाख चोरांनी प्रत्येकवेळी अनोख्या आयडिया लावून केलं आहे. चोरी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी वयोवृध्द नागकरिकांच्या लक्षात आल्या आहेत. सध्याचं प्रकरण सुध्दा भयानक आहे.

वयोवृध्द नागरिकांसोबत इंग्रजी भाषेत संवाद साधत आधार दिला, मग चोरट्यांनी त्यांच्याकडील...,
Dombivli police stationImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 10, 2023 | 7:58 AM
Share

डोंबिवली : वयोवृद्ध नागरिकांना (senior citizens) टार्गेट केलं जात असल्याचं वारंवार उजेडात आलं आहे. वयोवृध्द इसमांना अनोख्या गोष्टी सांगून गुंतवून ठेवायचं आणि नंतर त्यांच्याकडे असलेल्या वस्तू ताब्यात घेऊन पोबारा करायचा असं अशी अनेक प्रकरण आतापर्यंत विविध शहरात उघडकीस आली आहे. काही घटनांमध्ये पोलिसांनी (Ram nagar Police) चोरट्याना शिताफीने अटक देखील केली आहेत. परंतु अशी प्रकरण वारंवार घडत असल्यामुळे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. डोंबिवलीचं (Dombivli)नुकतचं उजेडात आलेलं प्रकरण भयानक आहे. इंग्रजी भाषेत संवाद साधून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीला लुटल्याचा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडल.

डोंबिवलीत दिवसाढवळ्या भुरट्या चोऱ्या, लुटमार, घरफोडीचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवलीत राहणारे 72 वर्षांचे सेवानिवृत्त अनिल तांबे हे आपली निवृत्तीची रक्कम स्टेट बँकेच्या टिळकनगर शाखेत काढून शहीद भगतसिंग मार्ग परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांना दोन भामट्यांनी रस्त्यात अडवून त्याच्याशी इंग्रजीतून संभाषण केलं.

त्यांना बोलण्यात गुंतवून वेलची खाण्यास दिली. त्यानंतर दुपारची वेळ आहे. तुम्हाला कोणी लुटेल. तुमच्या जवळील पैसे सोन्याचा ऐवज आमच्या जवळ द्या, असे बोलून त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याचा ऐवज एका पिशवीत बाधत त्यांनी तोंडातील वेलचीचा चोथा जवळच्या झाडाच्या बुडाशी टाकण्यास सांगितला. अनिल तांबे हे झाडाजवळ जाताच त्यांच्यापासून काही अंतरावर असलेले दोन्ही भुरटे चोर अनिल तांबे यांनी त्यांच्या हातात स्वाधीन केलेली पिशवी घेऊन पळून गेले.

पिशवीत रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असा एकूण 39 हजारांचा ऐवज होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनिल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. सध्या रामनगर पोलिसानी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारे भुरट्या चोराकडून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.