Corona Updates: कोरोना हरतोय? विषाणूची तीव्रता कमी, औरंगाबादमधील कुठे किती जण उपचार घेतायत?

| Updated on: Jan 07, 2022 | 9:46 AM

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं अगदी सौम्य असल्याचे दिसून येत आहे.

Corona Updates: कोरोना हरतोय? विषाणूची तीव्रता कमी, औरंगाबादमधील कुठे किती जण उपचार घेतायत?
CORONA AND DOCTOR
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय, मात्र या विषाणूची तीव्रता कमी झालेली दिसून येत आहे. गुरुवारी शहरात कोरोनाचे 111 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात 17 नव्या रुग्णांची भर पडली. सुदैवाने दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरीही फार कमी रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे शहरात बऱ्या झालेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज पडली नाही. शहरातील 62.5% रुग्ण हे घरातच विलगीकरणात राहत आहेत. केवळ 37.5 % रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तरीही रुग्णांनी शक्यतो घरीच रहावे, बाहेर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू अशक्त झालाय!

राज्यात 36 हजार 265 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. ही वस्तुस्थिती असली तरीही हा विषाणू प्राणघातक नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरू नका, सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असा सल्ला राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिला आहे.

कुठे किती रुग्णांवर उपचार सुरू?

सध्या औरंगाबादमध्ये आरोग्य यंत्रणेतर्फे घाटी आणि मेल्ट्रॉन या रुग्णालयांमध्येच उपचार सुरु आहेत. तसेच काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्येही उपचार घेत आहेत. कुठे किती रुग्णांवर उपचार सुरु आहेत, त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे-
घाटी रुग्णालय- 08
खासगी रुग्णालये- 54
मेल्ट्रॉन हॉस्पिटल-52
होम आयसोलेशन- 190
एकूण सक्रिय रुग्ण- 304

होम आयसोलेशनमध्ये काय उपचार?

मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगडकर यांनी सांगितले की, ज्या रुग्णांना कोणताही गंभीर त्रास नाही, त्यांच्यासाठी होम आयसोलेशनचा पर्याय वापरला जात आहे. सध्या रुग्णांना केवळ व्हिटॅमिन सी आणि डी च्या गोळ्या दिल्या जात आहेत. इतर औषधांची गरज पडत नाही. खासगी रुग्णालयातही अनेकांना ओपीडीत उपचार देऊन होम आयसोलेशनचा पर्याय दिला जात आहेत. केवळ वय आणि व्याधी अधिक असलेल्या रुग्णांना दाखल केले जात आहे.

नादुरुस्त व्हेंटिलेटर्स तत्काळ दुरुस्तीचे आदेश

घाटी रुग्णालयातील 433 पैकी 324 आयसीयू व्हेंटिलेटर आहेत. त्यातील 22 नादुरुस्त आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेत शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या 60 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरजही पडणार नाही. 4 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर राहतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

इतर बातम्या-

16 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, सोलापुरात नराधम बापाला अटक, आईचीही साथ

Corona | विदेशी पार्श्वभूमी नसलेलेही ओमिक्रॉनबाधित, नागपुरात कोरोनाचे 441 पॉझिटिव्ह; समूह संसर्ग होणार?