महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता, 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाणांचे वक्तव्य

| Updated on: Sep 25, 2021 | 5:36 PM

औरंगाबाद: साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी (Higher education minister) एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. […]

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता, 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाणांचे वक्तव्य
41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.
Follow us on

औरंगाबाद: साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी (Higher education minister) एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. असंही मत त्यांनी व्यक्त केलं त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं. आज औरंगाबाद शहरात 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार (Babu Biradar), मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil), आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

 तंत्रत्रानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करावा- चव्हाण

या कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते. तसेच माणसाचे विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखनातून मिळते. म्हणूनच साहित्याचा उल्लेख समाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो, असेही अशोक चव्हाण उद्घाटनपर भाषणात म्हणाले.

नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाची मागणी

संमेलनाच्या प्रास्तिविकात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. तसेच नांदेड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयाचे काम सुरु होण्याची मागणीही यावेळी त्यांनी बोलताना केली.

बाबू बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाश

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे आहेत. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाशन अशोक चव्हाण आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान देशमुख यांच्या ‘संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर मसापच्या ‘गोंदन’ या स्मरणिकेचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बोलताना बाबू बिरादार म्हणाले, ‘मराठवाड्याची संत परंपरा, निसर्ग, अनुभव व संस्कार यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक जमिनीवर राहून लिखाण करीत आहे.’ तसेच बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व जीवनातील अनुभवही व्यक्त केले. (There is a possibility of establishing a Marathi language university in the state, said Ashok Chavan, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

शाळा उघडण्याच्या बातमीनं विद्यार्थ्यांमध्ये आनंद, वाचा औरंगाबाद जिल्ह्यात किती खासगी, किती सरकारी शाळा?

वीजेच्या लपंडावामुळे घरगुती उपकरणे जळाली, लासूरमध्ये महिलांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा