Aurangabad Gold: सोने-चांदीत घसरणीचाच ट्रेंड, पितृपक्षामुळे ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ, वाचा औरंगाबादचे भाव

| Updated on: Sep 23, 2021 | 3:25 PM

आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46,400 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर शुद्ध चांदीचे दर 64 हजार रुपये प्रति किलो एवढे होते.

Aurangabad Gold: सोने-चांदीत घसरणीचाच ट्रेंड, पितृपक्षामुळे ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ, वाचा औरंगाबादचे भाव
Follow us on

औरंगाबाद: गेल्या दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) घट दिसून येत आहे. यंदाच्या आठवड्यातही घसरणीचा ट्रेंड दिसून आला. मात्र सध्या सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळा या दरांच्या आसपास रेंगाळल्याचे चित्र आहे. औरंगाबादच्या सराफा मार्केटमध्येही (Aurangabad Sarafa merket) सोन्याचे दर तीन दिवसांपासून याच पातळीवर स्थिर असल्याची माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरातले भाव काय आहेत?

आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46,400 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर शुद्ध चांदीचे दर 64 हजार रुपये प्रति किलो एवढे होते. मागील आठवड्यात चांदीच्या दरांनी 63 हजारांची पातळी गाठली होती. यंदा मात्र हे दर 64 हजारांच्या पातळीभोवती स्थिर आहेत, अशी माहिती औरंगाबाद सोनार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

पितृपक्षामुळे नागरिकांची पाठ

सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे या काळात महत्वाची, मौल्यवान खरेदी करणे टाळले जाते. त्यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीतही खूप घट झाल्याचे दिसून येत आहे. शुद्ध सोने किंवा शुद्ध चांदी एकवेळ खरेदी केली जाते. मात्र या काळात सोन्याच्या किंवा चांदीच्या दागिन्यांची खरेदी फार तुरळक स्थितीत होते, अशी माहिती सराफा व्यापारी, दत्ता सराफ यांनी दिली.

फक्त 1 रुपयात सोने खरेदी करा

सध्या देशात GooglePay, Paytm सारखी बरीच वॉलेट आहेत, जी आपण मनी ट्रान्सफर किंवा खरेदीसाठी वापरतो. या कंपन्या तुम्हाला डिजिटल सोने खरेदी करण्याची परवानगी देतात. या व्यतिरिक्त एचडीएफसी बँक सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इत्यादी देखील 999.9 शुद्ध प्रमाणित सोने केवळ 1 रुपयात डिजिटल खरेदी करण्याची सुविधा देतात. या प्लॅटफॉर्मवर MMTC-PAMP चा करार आहे. जेव्हा तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन कडून सोने खरेदी करता, तेव्हा ते सोने या एमएमटीसी-पीएएमपीच्या सेफ्टी व्हॉल्ट्समध्ये सुरक्षित ठेवले जाते. जोपर्यंत शुद्धतेचा प्रश्न आहे, MMTC-PAMP चे सोने 99.9 टक्के शुद्ध आहे, म्हणजेच 24 कॅरेट शुद्ध सोने उपलब्ध होईल.

इतर बातम्या-

Gold Price Update : दिवाळीआधी सोन्याचे भाव वाढण्याचे संकेत, सध्या सोन्याचे दर स्थिर, सराफा व्यापाऱ्यांचं भाकीत

प्रत्येक स्टेडियममध्ये ‘सफारी’चा जलवा, Tata Safari Gold एसयूव्ही IPL 2021 ची ऑफिशियल पार्टनर