औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय

| Updated on: Oct 07, 2022 | 5:56 PM

काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं.

औरंगाबाद मनपात एकला चलो रे?, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला पर्याय काय
प्रकाश आंबेडकर म्हणतात,...
Image Credit source: t v 9
Follow us on

संजय सरोदे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जालना : औरंगाबाद महापालिकेत वंचित बहुजन आघाडी वेगळी लढण्याच्या तयारीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जालन्यात हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे. आम्ही युती केली तर शिवसेना, काँग्रेसबरोबर (Congress) करायला तयार आहोत. परंतु अजूनही काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

वेगळे लढण्याच्या तयारीला लागले

आमची भूमिका स्पष्ट आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसची अस्पष्ट भूमिका आहे. सर्व पक्ष वेगवेगळे लढतील. त्यामुळे आम्ही वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेला सोबत घेण्याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल, असेही आंबेडकर यांनी सांगितलं.

घटना बदलण्याचा अजेंडा

भाजपा आणि आरएसएस यांचा एकमेव अजेंडा घटना बदलण्याचा आहे. सेनेबरोबर मतभेद असलेले तरी शिवसेना घटना बदला म्हणत नाही. त्याचाच एकभाग काँग्रेस आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसला युती बाबत हाक दिली. असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सर्व पक्ष वेगवेगळे लढतील

पण, जी माहिती देण्यात आली त्यावरून काँग्रेस, शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस, शिवसेनेची भूमिकेवरून सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असं वाटतं. त्यामुळं आम्हीसुद्धा वेगळे लढण्याच्या तयारीला लागलो असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आम्ही निरोप पाठविला आहे. त्यांनी रिस्पान्स करण्याचा भाग आहे. रिस्पान्स न मिळण्याचे योग्य वेळेस कारण सांगू. महाराष्ट्र समितीत निर्णय घेईल. अजून जादुची कांडी निघाली नाही, की, शंभर दिवसात बदलेलं असं मला कधीचं वाटत नाही.