AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…मग तुमची उदबत्ती पेटवा’, गोपीचंद पडळकरांचा गाण्यातून कोणाला इशारा?

आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा अवतार. राजकारणानंतर आता गाण्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन. सोशल मीडियावर जोरदार चर्चा.

'...मग तुमची उदबत्ती पेटवा', गोपीचंद पडळकरांचा गाण्यातून कोणाला इशारा?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 05, 2026 | 6:47 PM
Share

Gopichand Padalkar New Song: नेहमी आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे आणि वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण राजकीय भाष्य नसून, त्यांचं नवं मराठी गाणं आहे. 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच गाजावाजा केला आहे.

‘आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा’ असे रोखठोक आणि आक्रमक बोल असलेलं हे गाणं सध्या विशेष चर्चेत आहे. या गाण्यात खुद्द गोपीचंद पडळकर मुख्य भूमिकेत दिसत असून त्यांनी गाण्याच्या ठेक्यावर स्वतः दमदार वावर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजकारणात जशा त्यांच्या भूमिका ठाम आणि परखड असतात तसाच आत्मविश्वास या गाण्यातूनही दिसून येतो आहे.

या गाण्याचं लेखन सचिन माळी यांनी केलं असून मिलिंद शिंदे यांनी गाणं गायलं आहे. संगीताची जबाबदारी मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी सांभाळली आहे. सध्या संपूर्ण गाण्यातील गोपीचंद पडळकरांचा पडद्यावरील वावर एखाद्या अनुभवी अभिनेत्यालाही टक्कर देणारा असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. धनगर आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या अनेक आंदोलनांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकांच्या काळात मतभेदांमुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

काही तासांमध्ये लाखो व्ह्यूज

यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. भाजपच्या तिकिटावर त्यांनी बारामतीत विधानसभा निवडणूक लढवली, मात्र अजित पवारांकडून त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आणि डिपॉझिटही जप्त झालं. तरीही भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधानपरिषदेत संधी दिली.

View this post on Instagram

A post shared by Thet Update (@thet.update)

दरम्यान, राजकारणासोबतच आता कला क्षेत्रातही आपली उपस्थिती दाखवणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी कमेंट्सद्वारे गाण्याचं आणि पडळकरांच्या या नव्या रूपाचं भरभरून कौतुक केलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी