AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत एकाच दिवशी दोन मृत्यू ! एकाचा ट्रेकिंगदरम्यान तर दुसरऱ्याचा डोहात बुडून शेवट

मित्रासह ट्रेकिंगला आलेल्या तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील सातारा डोंगरात घडली.

औरंगाबादेत एकाच दिवशी दोन मृत्यू ! एकाचा ट्रेकिंगदरम्यान तर दुसरऱ्याचा डोहात बुडून शेवट
AURANGABAD YOUNG MAN DEATH
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 4:47 PM
Share

औरंगाबाद : मित्रासह ट्रेकिंगला आलेल्या तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील सातारा डोंगरात घडली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव लखन ईश्वर पवार असे असून तो औरंगाबाद शहरातील शिवशंकर कॉलिनिमधील रहिवाशी आहे. या गंभीर दुर्घटनेत एकूण 6 जण सुदैवाने बचावले आहेत. (young boy trekking with friend drowned in lake in Satara hills Aurangabad)

ट्रेकिंगदरम्यान तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेत सध्या मोठा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. पर्यटकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बेत आखले आहेत. औरंगाबाद येथील सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र आले होते. हे सातही जण डोंगर परिसरताली तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले आहेत. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

डोहात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

दर दुसरीकडे औरंगाबाद शहरातच मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला. पाणी गढूळ झाल्याने मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणी येत होत्या.मात्र, शेवटी अथक परिश्रमाने या बारा वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

इतर बातम्या :

इशारा देऊनही कार्यवाही नाही, औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचे मनसे कार्यकर्त्यांनी नळ कनेक्शन कापले!

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

Video : औरंगाबादमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कारखान्याचं मोठं नुकसान

(young boy trekking with friend drowned in lake in Satara hills Aurangabad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.