इशारा देऊनही कार्यवाही नाही, औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचे मनसे कार्यकर्त्यांनी नळ कनेक्शन कापले!

मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन कापलंय. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न न सोडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं.

इशारा देऊनही कार्यवाही नाही, औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचे मनसे कार्यकर्त्यांनी नळ कनेक्शन कापले!
औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचे मनसे कार्यकर्त्यांनी नळ कनेक्शन कापले

औरंगाबाद : मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन कापलंय. औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न न सोडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन कापल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे साडेपाच वाजता महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कनेक्शन मनसे कार्यकर्त्यांनी कापलं.

8 दिवस उलटूनही कार्यवाही नाही, कार्यकर्त्यांनी दाखवला ‘मनसे दणका’

शहराचा पाणी प्रश्न सुटावा, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच त्यांना सविस्तर निवेदन दिलं होतं. पुढच्या आठ दिवसात यावर कार्यवाही करा असं मनसे कार्यकर्त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून सुचवलं होतं. मात्र आठ दिवस उलटून गेल्यानंतरही महापालिका आयुक्तांनी कुठलीच कार्यवाही न केल्याने अखेर मनसे कार्यकर्त्यांनी पुढचं पाऊल उचललं.

सकाळी साडे पाच वाजता आयुक्तांच्या घराचं नळ कलेक्शन कापलं

आज सकाळी साडेपाच वाजता काही मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या घराचं नळ कलेक्शन कापलं. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न न सोडवल्यामुळे हे कनेक्शन कापत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी आयुक्तांविरोधात नाराजीचा पाढा वाचला.

आता आयुक्तांना कळेल नागरिकांना नेमका काय त्रास होतोय…!

महापालिका आयुक्तांच्या घराचं आता आम्ही नळाचं कनेक्शन कापलंय. आता जेव्हा त्यांच्या घरात पाणी येणार नाही, त्यावेळी त्यांना पाण्याचं महत्त्व कळेल. तसंच मागील काही दिवसांपासून सर्वसामान्य औरंगाबादकर कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची जाणीव देखील त्यांना होईल, असं मनसे कार्यकर्ते म्हणाले.

आयुक्तांना इशारा दिल्यानंतर आठ दिवसात मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या घरचं नळ कनेक्शन कापलं आहे. औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा यानिमित्ताने चांगलाच चिघळलेला आहे. आतातरी आयुक्तांनी लक्ष घालून हा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी मनसेने केली आहे.

(MNS workers cut off the tap connection of Aurangabad Municipal Commissioner house)

हे ही वाचा :

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

Aurangabad | औरंगाबादेत लसीकरण पुन्हा केंद्रावर गोंधळ, लसतुटवड्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी

Published On - 8:15 am, Sun, 18 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI