बार, आठवडी बाजार सर्रासपणे सुरु, कल्याणमध्ये नियमांचे तीन तेरा, भाजप आमदाराकडून महाविकास आघाडीवर निशाणा

| Updated on: Apr 17, 2021 | 12:01 AM

कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे (Bar and market are open in Kalyan Dombivli during lockdown).

बार, आठवडी बाजार सर्रासपणे सुरु, कल्याणमध्ये नियमांचे तीन तेरा, भाजप आमदाराकडून महाविकास आघाडीवर निशाणा
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण पूर्व भागात संचारबंदी असतांना सुरु असलेल्या बारवर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बार सील केला आहे. या प्रकरणी बार मालकासह 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणावरुन स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. गणपत गायकवाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे (Bar and market are open in Kalyan Dombivli during lockdown).

गणपत गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“ज्या धंद्यातून हप्ते जमा होत आहेत ते धंदे सरकारने सुरु ठेवले आहे. सर्व सामान्यांना वेठीस धरले आहे. खरंतर या सरकारमध्ये कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कायदे पाळले जात नाहीत. सरकारला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळेच दोन नंबरचे धंदे, बार, पब, डिस्को सुरु आहेत. या धंद्यांना मुभा दिली आहे. सामान्यांना वेठीस धरुन सामान्यांची गरज भागविणारी दुकाने बंद केली आहेत. बार मुख्य रस्त्यावर सुरु आहे. पैसा जमा केल्याशिवाय बाकी कोणतेही काम करु द्यायचे नाही हेच या सरकारचे म्हणणे आहे” अशा शब्दात टीका करत गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

कल्याणबंदी संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन

कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण डोंबिवली पूर्व मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशमुख होम्स जवळ आणि नांदिवली परिसरात शुक्रवारी आठवडा बाजार भरला होता. मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडले होते. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला होता. महिला, लहान मुलं हे खरेदी करत होते. कुठेही संचारबंदीच्या नियमांचे पालन होताना दिसून आलं नाही.

विजय नगरमध्ये चक्क बार सुरु

कल्याण पूर्व भागातील विजय नगर परिसरात चक्क बार सुरु होता. या बारमध्ये बसून लोक मद्यपान करीत होते. कोळसेवाडी पोलिसांनी या बारवर छापा टाकला. पोलिसांकडून सध्या कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. ही परिस्थिती पाहून कल्याण डोंबिवलीत संचारबंदी लागू आहे की नाही? तसेच नागरीकांनी कोरोनाचे भय आाहे की नाही? असे प्रश्न निर्माण होतात (Bar and market are open in Kalyan Dombivli during lockdown).

हेही वाचा : Reality Check | स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव