Beed Crime : 10 दिवसांपूर्वीच वास्तूशांती झालेल्या अलिशान बंगल्यावर नर्तकीची नजर फिरली अन्… बीडच्या उपसरपंचाच्या प्रकरणात समोर आली मोठी अपडेट

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिला पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत तिला पाठवण्यात आलंय. मात्र, गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून धक्कादायक खुलासा झालाय.

Beed Crime : 10 दिवसांपूर्वीच वास्तूशांती झालेल्या अलिशान बंगल्यावर नर्तकीची नजर फिरली अन्... बीडच्या उपसरपंचाच्या प्रकरणात समोर आली मोठी अपडेट
| Updated on: Sep 11, 2025 | 2:12 PM

सोलापुरच्या सासुरे गावात एका व्यक्तीने चारचाकी गाडीत बसून स्वत:वर गोळी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. गाडीत स्वत: वर गोळी झाडणारा व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी लुखामसला गावच्या सरपंचांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातील नतर्की पूजा गायकवाड हिच्या घराच्या पुढे गाडी लावून स्वत:वर गोळी झाडली. मागील दीड वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता आणि त्यादरम्यानच त्यांची ओळख ही पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. गोविंद हा पूजाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, तो आपल्या लेकरांचा देखील विचार करत नव्हता. पूजाला महागडा मोबाईल असो किंवा दागिने…त्याने प्रत्येक गोष्ट दिली. गोविंद बर्गे याने काही दिवसांपूर्वीच गेवराईत आलिशान बंगला बांधला. त्याठिकाणी त्याचे संपूर्ण कुटुंब राहत होते.

गोविंद बर्गे याच्या गेवराईतील बंगल्याची दहा दिवसांपूर्वीच वास्तूशांती झाली. अत्यंत आलिशान असा हा बंगला होता. गोविंदचा बंगला पाहून पूजाच्या अपेक्षा अधिकच वाढल्या. फक्त अपेक्षाच नाही तर तिने थेट गेवराईतील तो बंगला माझ्या नावे कर म्हणून त्याच्या मागे तगादा लावला. बंगल्याची वास्तूशांती झाल्यापासून पूजाने गोविंद याच्यासोबत बोलणेही बंद केले. पूजा बोलत नसल्याने गोविंद व्याकूळ झाला.

तो थेट तिच्या सासुरे गावात तिला भेटण्यासाठी पोहोचला. मात्र, दोघांमधील वाद मिटलाच नाही. दहा दिवसांपूर्वी बंगल्याची वास्तूशांती झाली. कुटुंबिय आनंदात होते. मात्र, पूजाला हे पटले नाही. दहा दिवसांपूर्वीही कोणीही साधा विचार केला नसेल की, याच बंगल्यामुळे गोविंद याला त्याचा जीव द्यावा लागेल. कला केंद्रातील नतर्की पूजा गायकवाड हिच्यावर गोविंद याच्या कुटुंबियांनी अजूनही काही गंभीर आरोप केली आहेत.