मोठी बातमी! बोगस भरतीतील शिक्षकांना दणका, थेट सेवाच समाप्त, शैक्षणिक विभागात खळबळ

बीडमधील 73 शिक्षकांची सेवा थेट समाप्त झाली आहे, पण हा आकडा आणखी वाढणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे, कारण 2012 पासूनच्या भरतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आता 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे.

मोठी बातमी! बोगस भरतीतील शिक्षकांना दणका, थेट सेवाच समाप्त, शैक्षणिक विभागात खळबळ
Bogus Teacher Recruitment Case Beed
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 4:04 PM

बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाने मोठा दणका दिला आहे. बीडमध्ये कथित बोगस भरतीतून नियुक्ती मिळवलेल्या 73 शिक्षकांची थेट सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा कारवाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बनावट पदांची निर्मिती करून नियुक्ती मिळवलेल्या आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचा दावा तक्रारदार सादेक इनामदार यांनी केला आहे.

2012 पासून भरती बंद, तरीही नियुक्त्या

राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून या नियुक्त्या दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. काही ठिकाणी संच मान्यतेत दुरुस्ती करण्याच्या नावाखाली शिक्षकांची पदे वाढवण्यात आली. तर काही ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांची संख्या दाखवून संच मान्यतेतील पदसंख्या वाढवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading...

या संपूर्ण प्रक्रियेत अन्य बनावट कागदपत्रांचाही वापर करण्यात आल्याची माहिती आहे. या कथित गैरव्यवहाराविरोधात बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी तक्रार केली होती. त्यांनी या प्रकरणाचा एसआयटीकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शिक्षण विभागाने 73 शिक्षकांची सेवा समाप्त केल्याची माहिती इनामदार यांनी दिली.

आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची शक्यता

दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बनावट पदांची निर्मिती करून नियुक्ती मिळवलेल्या आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाई होऊ शकते, असा दावा सादेक इनामदार यांनी केला आहे. त्यामुळे आतापर्यंत 73 शिक्षकांवर झालेल्या कारवाईनंतर आता उर्वरित शिक्षकांबाबत शिक्षण विभाग काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

आष्टीकरांची तहान भागवण्यासाठी धरणावर टँकरच्या रांगा; दररोज 150 टँकरने पाणीपुरवठा

बीड : आष्टी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. अशा परिस्थितीत आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मेहकरी धरणातून दररोज तब्बल 150 टँकरद्वारे तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी भरण्यासाठी मेहकरी धरणावर टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दृश्यांमधून आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईची भीषणता अधोरेखित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us