“बाप्पा मला माफ करा, मी तुम्हाला…”, धनंजय देशमुख खासदार बजरंग सोनवणे यांना असं का म्हणाले?

संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे गायब झाले आहेत. त्यांचा कुठेही संपर्क होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच आता धनंजय देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची माफी मागितली आहे.

बाप्पा मला माफ करा, मी तुम्हाला..., धनंजय देशमुख खासदार बजरंग सोनवणे यांना असं का म्हणाले?
bajrang sonavane dhananjay deshmukh
| Updated on: Jan 13, 2025 | 5:36 PM

Santosh Deshmukh Murder case : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. पण वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी अटक झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. यावरुन मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे गायब झाले आहेत. त्यांचा कुठेही संपर्क होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच आता धनंजय देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची माफी मागितली आहे.

संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख सकाळपासून गायब झाले आहेत. त्यांचा मोबाईल स्विच्ड ऑफ येत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या सर्व गावकऱ्यांनी धनंजय देशमुख यांच्यासाठी शोधकार्य सुरु केले. त्यांच्या घरात रडारड सुरु झाली. धनंजय देशमुख यांचा संपर्कही होत नव्हता. ते कुठे गेले याची माहितीही समोर आलेली नाही. त्यातच आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र धनंजय देशमुख यांनी खासदार बजरंग सोनावणे यांच्यासाठी एक निरोप ठेवला आहे.

बाप्पा मला माफ करा, मी तुम्हाला नंतर भेटतो

खासदार बजरंग सोनावणे हे मस्साजोगमध्ये दाखल झाले. मात्र तरीही धनंजय देशमुख आणि बजरंग सोनावणे यांची भेट झाली आहे. “बाप्पा मला माफ करा, मी तुम्हाला नंतर भेटतो”, असा निरोप धनंजय देशमुख यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना दिला आहे. “मला धनंजय देशमुख दिसत नाही म्हणून मी चिंतेत आहे. मला निरोप आला की बाप्पांना आता भेटू शकत नाही. यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.”

“मी त्यांच्यावर बिल्कुल समाधानी नाही”

यावेळी बजरंग सोनावणे यांना धनंजय देशमुख मला भेटत नाही. कुठे आहे तो? असे बजरंग सोनावणेंनी विचारले. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी ते आता घरात आहेत, असे सांगितले. बजरंग सोनावणे यांचे संरक्षण करणे आणि त्यांना साथ देणं ही आपली जबाबदारी आहे साहेब. तुमचे डीवायएसपी चार महिने झाले इथे ड्युटी करतात. मी त्यांच्यावर बिलकुल समाधानी नाही, असेही बजरंग सोनावणेंनी सांगितले.