बीडमध्ये पुन्हा एकदा पुतण्याचा विजयी गुलाल, काकाची धुळधाण, राजूरी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादीची मोहोर!

| Updated on: Feb 07, 2022 | 5:14 PM

शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी गावची सेवा सोसायटी ताब्यात यावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. मात्र त्यांना पूर्णतः अपयश मिळाले.

बीडमध्ये पुन्हा एकदा पुतण्याचा विजयी गुलाल, काकाची धुळधाण, राजूरी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादीची मोहोर!
Follow us on

बीडः बीड तालुक्यातील राजूरी येथील सेवा सोसायटीच्या (Rajuri Seva Society) 13 जागेंसाठी निवडणूक पार पडली. सोसायटीच्या 13 ही जागेवर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा दणदणीत विजय झाला. तर शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांना मात्र या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावातच गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. राजुरी हे गाव दोन्ही क्षीरसागर यांचे आहे. त्यामुळे इथे काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुन्हा एकदा पुतणे संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभवाची धूळ चारली आहे. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुतणे संदीप क्षीरसागर यांची सुरू असलेली घोडदौड ही काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जातेय.

राजुरी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादीचा विजय

काका-पुतण्या वादाची परंपराच!

बीड जिल्ह्यातील राजकारणात काका आणि पुतण्याचा वाद काही नवीन नाही. मात्र गोपीनाथ मुंडेंनंतर बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा राजकीय कट्टरवाद राज्यासमोर आलाय. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी गावची सेवा सोसायटी ताब्यात यावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. मात्र त्यांना पूर्णतः अपयश मिळाले.

आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील तळ ठोकून

काका पुतण्यात खरी राजकीय लढाई सुरू असतानाच राजुरी येथील सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी गावातच तळ ठोकून राहिले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत पहावयास मिळाली. रवींद्र क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे लहान बंधू आहेत.

इतर बातम्या-

एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा