‘मी शूरवीर योद्धा, तुमच्यासाठी युद्ध लढेन’, पंकजा मुंडे यांचं परळीकरांना आश्वासन

"यावर्षी कारखान्याच्या चिमणीतून धूर निघणार म्हणजे निघणार. फक्त तोंडावर बोलतात लोकं. तोंडावर वेगळं आणि पाठीमागे वेगळं बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. जे पोटात आहे तेच ओठात आहे ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. मी कधीच खोटं बोलणार नाही. मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दिला आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मी शूरवीर योद्धा, तुमच्यासाठी युद्ध लढेन', पंकजा मुंडे यांचं परळीकरांना आश्वासन
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 3:10 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यातील परळीत दाखल झाल्या. त्यांचं परळीत जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे या पारंपारिक बंजारा समाजाच्या वेशात दिसून आल्या. यावेळी पंकजा यांनी परळीकरांना लोकसभेत मतदान करण्याचं आवाहन केलं. “मी खूप लोकांचे हाल पाहिले. पण जेव्हा सत्ता आली तेव्ही मी सर्व काही केलं. मला आज लोकं म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय? मी सांगते, 2014 ते 2019 मध्ये मी केलला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास. हा मुद्दा प्रत्येत जातीपातीची भिंत पाडून टाकणार आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “या जिल्ह्यात राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे मला आता जिल्ह्यात जास्त फिरता येईल. परळी म्हटलं की चिंता कमी करावी लागेल. सर्वजण कामाला लागतील. तुमची बहीण यावेळी संसदेत जाणार आहे. मी शूरवीर योद्धा आहे. तुमच्यासाठी संसदेत बसून युद्ध लढेन. दांडपट्टा घालून माझ्या वंचितांसाठी, बंजारा बांधवांसाठी चंद्र, सूर्य, तारे सुद्धा तोडून आणावे लागले तर तेही करेन”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“यावर्षी कारखान्याच्या चिमणीतून धूर निघणार म्हणजे निघणार. फक्त तोंडावर बोलतात लोकं. तोंडावर वेगळं आणि पाठीमागे वेगळं बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. जे पोटात आहे तेच ओठात आहे ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. मी कधीच खोटं बोलणार नाही. मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दिला आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा यांच्याकडून वडिलांच्या आठवणींना उजाळा

यावेळी पंकजा मुंडे यांनी आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. “गोपीनाथ मुंडे यांना सर्व सामाजांचं खूप प्रेम मिळवलं. असा कुठला समाज नाही जो गोपीनाथ मुंडे यांची आठवणी सांगत नाही. आताच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची आठवण झाली. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. ते सुधाकरराव नाईक यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेले. तेव्हा मलाही घेऊन गेले. मला अजून आठवतं की, सकाळी त्यांनी मला वर्षा बंगल्यावर नाष्टा खाऊ घातला. माझ्या वडिलांना म्हणाले, गोपीनाथ तुला सागर बंगला देतो. विरोधी पक्षनेत्याला कधीच सागर बंगला मिळाला नाही. पण मी तुला देतो. कारण तू सामान्य माणसांचा, वंचितांचा काम करशील. पक्ष कुठलाही असेल, पण त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आशीर्वाद दिला. यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही”, अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.

‘पहिल्यांदाच लाल दिवा देण्याचं काम आम्ही केलं’

“पोहरादेवीला मुंडे साहेबांनी एवढं प्रेम केलं की, ते दवर्षी राम नवमीला पोहरादेवीला जात होते. अनेक वर्ष कोरोना संकटाच्याआधी मीदेखील तिथे जात होती. माझे बंधू संजय राठोड मंत्री झाले. त्यावेळी ग्रामविकास खात्यातून आम्ही प्रस्ताव तयार केला. आम्ही पोहरादेवीच्या विकासासाठी साडेचारशे कोटींचा प्रस्ताव मंजूर केला. या जगामध्ये एकच समाज आहे, ज्या समाजाने आपली संस्कृती, वेशभूषा, भाषा जपली. तो माझा बंजारा समाज आहे. तिथे मी बंजारा भाषेत भाषण केलं. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील तिथे आले होते. आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला. बंजारा समाजाने भरपूर प्रेम दिला. मी तिथल्या सरकारला भांडले की, एवढं प्रेम बंजारा समाज करतो. पण आपण एकही पद बंजारा समाजाला दिलं नाही. मग तिथे आम्ही कॅबिनेटचा दर्जा असणारा भटक्या-विमुक्त आघाडीचं महामंडळ हे आम्ही आमच्या बंजारा बांधवाला मिळवून दिलं. पहिल्यांदाच इतिहासात लाल दिवा देण्याचं काम आम्ही केलं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.