बेळगावमध्ये काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Belgaum Fire Accident: देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र आहे. गणेश चतुर्थीच्याच रात्री मात्र एक दुर्दैवी अपघात झाला.

बेळगावमध्ये काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
| Updated on: Sep 15, 2026 | 9:53 AM

देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र आहे. गणेश चतुर्थीच्याच रात्री मात्र एक दुर्दैवी अपघात झाला. बेळगावमधील चव्हाट गल्लीत काळीज पिळवटून टाकणारी घटनी घडली. एका दुकानाला आणि घराला भीषण आग लागली. या भीषण आगीत कुटुंबातील चार जणांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडत होत्या. काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्याचे पाहायला मिळाले. घरामधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्दैवी दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत, या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. ज्यामुळे सर्व जळून खाक झाले. मजुरी करून हे कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह करत असे. या कुटुंबासोबत झालेल्या या घटनेमुळे  संपूर्ण चव्हाट गल्ली परिसर सुन्न झाला आहे. ही दुर्घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, पोलिस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी लगेच धाव घेतली होती आणि आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील आणखी तपास सुरु आहे.
सर्वत्र सणाचा उत्साह असताना मागील एक ते दोन दिवस अशा दुर्दैवी घटना घडताना दिसत आहे. अनेक चाकरमानी मुंबईन कोकणाच्या दिशेने रवाना झाले होते. या काळात काही गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मागील एक ते दोन दिवसांत समोर आल्या आहेत. सणासमारंभात अशा दुर्दैवी घटना घडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us