महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रद्द, कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली

महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रद्द, कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली
| Updated on: Dec 19, 2022 | 10:24 AM

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामेळावा (Maharashtar Ekikaran Samiti Mahamelava) होणार होता. या मेळाव्याला कर्नाटक सरकारने (Maharashtra Karnataka Seemavad) परवानगी नाकारली आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदीचा आदेशही देण्यात आला आहे. या महामेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठ पोलिसांनी हटवलं आहे. या स्टेजवरचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

महामेळावा रद्द

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा महामेळावा आता रद्द करण्यात आला आहे. आज संध्याकाळी हे साहित्य महाराष्ट्र एकीकरण समितीला परत देण्यात येईल.

महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगावमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने यांनी आपण बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. धैर्यशील माने यांना कानडी भाषेत पत्र आलं. त्यातून त्यांना प्रवेश नाकारल्याचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीने बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मविआचे तीन महत्त्वाचे नेते हजारो कार्यकर्त्यांसह बेळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, संजय पवार आणि विजय देवणे हे तीन नेते बेळगावला जाणार आहेत. सोबत शेकडो कार्यकर्तेही असणार आहेत.

काँग्रेसची भूमिका

या सगळ्या सीमा प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते सरकारवर हल्लाबोल करत आहेत.सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. मंत्र्यांची नेत्यांची अडवणूक होतेय. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने आपल्या लोकांची अडवणूक करत आहे. त्यांना आता ठोस उत्तर देण्याची गरज आहे, असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.