मुंबईकरांना बेस्टकडून गिफ्ट मिळणार! प्रवाशांचा ताण आणखी कमी होणार? काय आहे नवा प्लान?

मुंबईकरांना बेस्टकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या प्रवाशांचा ताण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी बेस्ट प्रशासन नवा प्लान आखण्याचा तयारीत आहे.

मुंबईकरांना बेस्टकडून गिफ्ट मिळणार! प्रवाशांचा ताण आणखी कमी होणार? काय आहे नवा प्लान?
best bus service
Image Credit source: tv9
| Updated on: Nov 07, 2026 | 9:53 AM

मुंबईकरांना ऐन दिवाळीत बेस्टकडून गिफ्ट मिळणार आहे. बेस्ट प्रवाशांचा ताण आणखी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बेस्ट प्रशासन आता बसमध्ये प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी आता युपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे संकेत देखील मिळाले आहेत.

बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन मानली जाते. बेस्ट बसमध्ये आता तिकीट खरेदीसाठी युपीआय पेमेंटची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रवाशांना सुट्ट्या पैशांची अडचण भासू नये आणि तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.  बेस्ट समितीचे सदस्य अजय सिंह यांनी यासंदर्भात लक्ष वेधले आहे.  बंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर आणि नागपूर यांसारख्या शहरांमधील सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.  मग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बससेवेत ही सुविधा का नसावी, असा सवाल अजय सिंह यांनी उपस्थित केलाय.  अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसल्याने तिकीट खरेदी करताना अडचणी निर्माण होतात. युपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाल्यास प्रवाशांसह बस वाहकांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे बेस्ट प्रशासन या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Loading...

रेल्वेकडूनही डिजिटलचा पर्यायाचा स्वीकार 

बेस्ट प्रशासनाआधीच रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. रेल्वे खिडकीवर तिकीट खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मासिक पास ते तिकीट खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडता येतो. रेल्वेचे मोबाईल अॅप देखील प्रवाशांसाठी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे प्रवासी ऑनलाइन तिकीट खरेदीची सुविधाचा वापर करत आहेत. बेस्टकडून ऑनलाइन तिकीट खरेदीसाठी अॅपची सुविधा उपलब्ध आहे. आता बेस्ट प्रशासन तिकीट खरेदीसाठी युपीआय पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याच्या तयारीत आहे. याचा मोठा फायदा बेस्ट बस प्रवाशांना होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us