लॉकडाऊनमध्ये हजारो बालकांचा मृत्यू, शहरातील बाळांना जास्त धोका

| Updated on: Feb 17, 2021 | 6:40 PM

फेब्रुवारी 2020 ते डिसेंबर 2020 या काळात तब्बल 12,179 नवजात बालकांचा मृत्यू झाला. (February December infants death)

लॉकडाऊनमध्ये हजारो बालकांचा मृत्यू, शहरातील बाळांना जास्त धोका
सांकेतिक प्रतिमा
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाने अनेक गोष्टी अनुभवल्या.  माहामारी काय असते?, तिचं स्वरुप काय असतं?, अशा अनेक गोष्टींचा अनुभव नव्या पिढीने घेतला. मात्र, नागरिकांच्या लॉकडाऊनमधील स्वास्थ्यासंबंधीच्या अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 2020 मध्ये फेब्रुवारी ते डिसेंबर या कालावधित महाराष्ट्रात तब्बल 12,789 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या बालकांच्या मृत्यूची कारणं वेगवेगळी आहेत. एका सामाजिक संस्थेला माहिती अधिकाराखाली ही माहिती मिळाली आहे. (Between February and December 2020 thousand of infants died)

मुंबईत सर्वाधिक बालकांचा मृत्यू 

लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवस्था ठप्प होत्या. आरोग्य सुविधासुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नव्हत्या. याविषयी राज्यातील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती नेमकी कशी होती?, लोकांचे स्वस्थ कसे होते?, याविषयी एका संस्थेने माहिती अधिकाराखाली सरकारकडे माहिती विचारली. या माहितीत लॉकडाऊनदरम्यान हजारो बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 200 मधील फेब्रुवारी ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रात तब्बल 12789 बालकांचा मृत्यू झाला.  मुंबई, अकोला, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये यापैकी 4411 बालकांचा मृत्यू झाला. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या 36 टक्के आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?

यावेळी माहिती अधिकाराखीली विचारलेल्या माहितीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. लॉकडऊनमध्ये मुंबईमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईत एकूण 1,097 बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अकोला 783, औरंगाबादमध्ये 729, नाशिकमध्ये 664, नागपूरमध्ये 587 आणि पुणे जिल्ह्यात एकूण 551 बालकांचा मृत्यू झाला. तसेच नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सिंधुदुर्गमध्ये 46, लातूरमध्ये 78 असे आहे. लॉकडाऊनच्या काळात वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 89 बालकांचा मृत्यू झाला.

दरम्यान ही आकडेवारी समोर आल्यानंतर राज्यातील प्रमुख शहरांत कुपोषणासारख्या समस्यांवर काम करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बालकांच्या स्वास्थ्याविषयी विशेष काळजी घेण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे. ही माहिती विचारणाऱ्या संस्थेने या संबंधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले आहे.

इतर बातम्या :

‘ऐकलं नाहीत तर याद राखा, विधानसभेत हक्कभंग आणणार’, मुनगंटीवारांचा निर्वाणीचा इशारा

“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट

भूमि पेडणेकरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

(Between February and December 2020 thousand of infants died)