भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत

| Updated on: Mar 11, 2022 | 4:10 PM

भंडाऱ्यातील संदीप भोंडे हा कुपवाडा येथे सैन्यात होता. नोकरीच्या ठिकाणी जात असताना गाडीला अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. त्यापैकी संदीपचा मृत्यू झाला. उद्या त्याच्या पार्थिवावर भंडाऱ्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत
भंडारा येथील संदीप भोंडे हा जवान कुपवाडा येथे वाहन अपघातात ठार झाला.
Image Credit source: tv 9
Follow us on

तेजस मोहतुरे 

भंडारा : जम्मू -काश्मीरमधील कुपवाडा (Kupwada in Jammu and Kashmir) येथे आर्मीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात भंडारा जिल्ह्यातील सुपुत्राचा मृत्यू झाला. 36 वर्षीय संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे (Bhandara’s Sandeep Bhonde) असं त्याचं नाव. संदीप हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता. काल तो कर्तव्यावर होता. कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगणवरून विलगीकरण केंद्राकडे जात होता. दरम्यान, सरकुल्ली येथे अनियंत्रित गाडीला अपघात झाला. यात संदीपसह पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर 168 मिलिट्री हॉस्पिटल ड्रगमुल्ला ( Military Hospital Drugmulla) येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान भंडारा शहरातील संदीप भोंडे या जवानाचा मृत्यू झाला. घरापासून सैन्याचा वारसा लाभलेला संदीप हा 2008 मध्ये 21 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. आपली पदोन्नतीची एक-एक पाऊले त्याने पादाक्रांत केली.

उद्या भंडाऱ्यात अंत्यसंस्कार

2016 ला संदीपचा विवाह झाला. त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. नुकतीच 75 दिवसांची रजा आटोपून तो पाच मार्चला आपल्या कर्तव्यावर गेला. तेथून आपल्या पोस्टिंग झालेल्या स्थानी जात होता. वाटेतच जवानांच्या झालेल्या अपघातात त्याचाचा दुदैवी मृत्यू झाला. संदीपच्या शवविच्छेदनाची परवानगी घेण्यासाठी कुटुंबाला फोन करण्यात आले. तेव्हा कुटुंबीयांना या दुःखत घटनेची माहिती मिळाली. त्याचाचा मृतदेह उद्या, शनिवारी भंडारा शहरात पोहचणार आहे. शासकीय इतमामात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या दुर्देवी मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

वडील, काका पोलीस दलात

संदीपचे वडील नुकतेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले. त्याचे वडील आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालक होते. मूळचे मोहाडी येथील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. काकासुध्दा पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले. एक लहान भाऊ व बहीण आहे. होळी निमित्ताने पुन्हा तो परत येणार होता. पण, आता संदीपचा मृतदेहच येणार आहे.

Maharashtra Budget 2022 : गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा काय?

ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळले; सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार

अमरावतीत वाहतूक कोंडी अन् जीवघेणे प्रदूषण! जनजागृतीसाठी परिसर संस्थेनं नेमकं केलंय काय?