Bhiwandi Building Collapsed : ढिगारा उपसताच मृतदेह, भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर; मृतांची नावे आली समोर

भिवंडीतील नारपोली गंगाराम वाडी येथे काल रात्री चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी आहेत. एनडीआरएफचे बचावकार्य अजूनही सुरू आहे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती आणि तिला नोटीस बजावली होती, तरीही काम सुरू होते. मृत व्यक्तींची नावे समोर आली आहेत.

Bhiwandi Building Collapsed : ढिगारा उपसताच मृतदेह, भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर; मृतांची नावे आली समोर
भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू
| Updated on: Jul 31, 2026 | 10:56 AM

भिवंडी महापालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी परिसरात काल रात्री 4 मजली ‘कोहिनूर’ इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखआली अनेक जण अडकले होते. घटनास्थळी धावून आलेल्या पोलिसांनी, तसेच एनडीआरएफच्या टीमने तातडीने बचावकार्य सुरू केले. याच दुर्घटनेप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. इमारत कोसळून आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 12 तासांच्या अथक प्रयत्नांती 9 व्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. 3 जण यात जखमी झाले आहेत. मात्र ढिगारा उपसण्याचे, तो बाजूला करण्याचे आणि आतमध्ये आणखी जे नागरिक अडकले असतील, त्यांना बाहेर काढण्याच बचावकार्य अद्यापही सुरू आहे. काल रात्री घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून आत्तापर्यंत 9 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकीयांच्या शोकाला, दु:खाला पारावार उरला नाहीये. अजून काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहेच.

मृतांची नावं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोहिनूर ‘ या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आत्तपर्यंत 9 जणांचे मृतदेह काढण्यात आले असून त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांपैकू 5-6 जणांची नावं समोर आली असून, उर्वरित मृतांबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मृतांची नावं खालीलप्रमाणे :

1) शमीम शेख वय 32

2) रंजीत सिंग वय 45

3) मिराज रसूल शेख वय 34

4) संतोष कुमार पांडे वय 42

5) शमीम अन्सारी वय 30

कशी घडली दुर्घटना ?

दरम्यान या दुर्घटनेनंतर विठ्ठल डागे अतिरिक्त आयुक्त भिवंडी महानगरपालिका यांनी माहिती दिली आहे. इमारत धोकादायक असल्याने पालिकेने या इमारतीला नोटीस बजावली होती . मात्र कुठल्याच प्रकारचा स्टेक्चर ऑडिट न करता या इमारतीचं काम मालकांकडून सुरू होतं , असं ते म्हणाले.

पालिका प्रशासनाला याची माहिती मिळताच रात्रीच्या वेळेला या ठिकाणी व्हिजीट करत त्या कामगारांना आणि रहिवाशांना इमारती मधून बाहेर काढण्यात येत होतं, मात्र तेव्हाच ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी तर नऊ जणांचा ढिगार्‍यखाली अडकल्याने मृत्यू झाला असून यापैकी सात जणांचे ओळख पटली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एकाच इमारतीच्या या दोन विंग असून अजून काही जणांचा शोध सुरू आहे, असही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us