
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष रणनीती तयार करण्यात व्यस्त आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींनाही सुरवात झाली आहे. उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले लोक पक्षांतर करत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी नवीन पक्षात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीतील बरेच नेते महायुतीतील पक्षात सामील झाले आहेत. मात्र आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला सहकारी पक्ष काँग्रेसचा एक बडा नेता फोडला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूकीपूर्वा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात सामील झालेला हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणूकीमुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. अब्दुल रशिद खान यांच्यासह असंख्य कार्यकर्तांनी आज मशाल हाती घेतली. यामुळे आगामी निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर एका दिवसाने 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कॉंग्रेसचे माजी महापौर रशिद मामू ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित… pic.twitter.com/e6u38cqE6i
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 19, 2025
सोलापूर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. आता याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. याचा परिणाम थेट आगामी महानगर पालिकेवर होण्याची शक्यता आहे.