AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राजकीय गणित बिघडवणारी खेळी, शरद पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे, निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! राजकीय गणित बिघडवणारी खेळी, शरद पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ
शरद पवार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 2:55 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढणार आहेत. दरम्यान या निवडणुकांपूर्वी आता पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक जण आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, तर काही जण आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करत आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.  ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

बीडमधलं राजकीय गणित बिघडणार? 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सध्या बीडसह मराठवाड्यात राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी असं चित्र आहे. याचा परिणाम हा या निवडणुकांवर देखील होण्याची शक्यात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांच्या सारखा बडा ओबीसी नेता आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं याचा मोठा फायदा हा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला होऊ शकतो.

दरम्यान दुसरीकडे कोल्हापूरच्या चंदगडमध्ये मात्र नगर पंचायत निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटात युती झाल्याचं पहायला मिळत आहे, त्यामुळे इतरही ठिकाणी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...