दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा सर्वात मोठा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, बळीराजाला दिलासा
दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा संपूर्ण महिला वगळता राज्यात पाऊसच झाला नाही. पाऊस न पडल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेला. राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर बनली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मोठी घोषणा केली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मानसी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे. ज्यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचं वाटप करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभा 33 जिल्ह्यातील सुमारे 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी माठा दिलासा देणारा निर्णय आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासोबतच इतही काही महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत.
ज्यामध्ये नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा तापी वळण योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून, यामाध्यमातून सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन करून परिसरातील सुमारे 26 हजार 526 हेक्टरला सिंचनाचा लाभ दिला जाणार आहे. तसेच वीज निर्मिती देखील केली जाणार आहे.
यासोबतच आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रीया आता अधिक जलद होणार. त्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापनेबाबत, व नव्वद दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा, यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास देखील या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.