मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्यानं संजय राऊत आणि दानवे यांच्यावर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ
uddhav thackeray
| Updated on: Jun 22, 2025 | 7:44 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नेमकं काय म्हटलं लाखे पाटील यांनी?

लाखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. मात्र ती  तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही,  संजय राऊतांनी सांगलीत संजय पाटलांशी समझोता केला, त्यामुळे सांगतील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे.

गेल्या 13 – 14 महिन्यांपासून संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल करण्यात आलं आहे. दैनिक सामनात नाव नोंदवून न घेणं, मानहानीकारक वागणूक यामुळे राजीनामा देत आहे.
मराठवाड्यातील संघटना कमकुवत होत आहे, उद्धवजी तुम्हाला शुभेच्छा, असंही यावेळी लाखे पाटील यांनी म्हटलं आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं.  या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे, अनेक दिग्गज नेते महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला होता, त्यानंतर आता आज पुन्हा एकदा एक धक्का बसला आहे. लाखे पाटील यांनी सचिवपद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.