मोठी बातमी! ‘वेदांता फॉक्सकॉनं’ महाराष्ट्रात गुतंवणूक करणार; अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची माहिती, प्रकल्प गुजरातला हलवल्याचं कारणही सांगितलं

आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना वेदांताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता कंपनी लवकरच महाष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. याबाबत वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट केले आहे.

मोठी बातमी! वेदांता फॉक्सकॉनं महाराष्ट्रात गुतंवणूक करणार; अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची माहिती, प्रकल्प गुजरातला हलवल्याचं कारणही सांगितलं
| Updated on: Sep 15, 2022 | 8:58 AM

मुंबई : ‘वेदांता फॉक्सकॉनं’ (Vedanta Foxconn) आपला प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांवर आरोप होत आहेत. आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना वेदांताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता कंपनी लवकरच महाष्ट्रात (Maharashtra) मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहे. याबाबत वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. महाराष्ट्राने वेदांता प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं अग्रवाल यांनी? 

आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटीबद्ध आहोत. वेदांता कंपनी लवकरच महाष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. गुजरातमधील प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र गुरुकिल्ली ठरणार आहे. महाराष्ट्राने वेदांता प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र गुजरात सरकारनं आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. अपेक्षा पूर्ण झाल्यानं प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विट वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केलं आहे.