भाजपाचा पहिला विजय, निवडणुकीआधीच फडकवला विजयाचा झेंडा; नेमकी काय कमाल केली?

BJP Victory : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात करत पहिला विजय मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

| Updated on: Nov 17, 2025 | 11:41 PM
1 / 5
सोलापूरच्या अनगर पंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात येत आहे.

2 / 5
माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. हा या निवडणुकीतील भाजपचा पहिला विजय आहे.

3 / 5
भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वखालील पॅनलचे 17 अर्ज दाखल झाले आहेत, मात्र विरोधी बाजून एकही अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

4 / 5
17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने जवळपास बिनविरोध निवड झाल्याने जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

5 / 5
मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उज्वला थिटे यांचा थेट सामना होणार आहे.