भाजपमध्ये फूट? 4 प्रमुख नेते वेगळ्या निर्णयाच्या तयारीत; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपमध्ये फूट पडल्याने चार नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी पद्धतीच्या कारभारावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. इंडिया आघाडीसह सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीनंतरही ज्ञानेश कुमार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु सध्याच्या वातावरणामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडली आहे. भाजपचे चार प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यात भाजप सरकार दिसणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, ‘भारतात ज्या प्रकारची खदखद आहे. ही खदखद फक्त विरोधकांमध्ये नसून भाजपमध्ये स्पष्ट दिसू लागली आहे. पुढील पाच ते सहा महिन्यात भाजप सरकार दिसणार नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहणार नाहीत. आणीबाणीच्या आधी किंवा त्यानंतर जनता पक्ष स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी काँग्रेसधील अनेक नेते पक्ष सोडून गेले होते. त्यावेळी जनजीवन राम, हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. त्याचप्रकारची भाजपमध्ये खदखद सुरू झाली आहे’.
‘भाजपमध्ये दुफळी, तिफळी माजलीये. मोदी यांच्या विरोधी आंदोलनात कोणताही प्रमुख नेता, मंत्री हे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे दिसत नाही. भाजपमधील मोदी-शहा यांच्या पर्वाचा अस्त होतोय, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. अनेक नेते भविष्यात मोदी-शहा या जोडीपासून दूर जातील किंवा वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपचे ४ प्रमुख नेते वेगळा निर्णयाच्या तयारीत आहे. अशी स्थिती भाजपमध्ये दिसत आहे. लवकरच हे दृश्य पाहायला मिळेल, असे राऊतांनी सांगितले.
मोदी आणि शहा हे सैन्यबळाचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत जम्मू-काश्मीर, आसाम, छत्तीसगडच्या सशस्त्र दल लाखोंच्या संख्येने उतरवण्यात आलं. त्यानंतरही लोक रस्त्यावर उतरले. काल हजारो जणांना ताब्यात घेतलं. मुंबईत देखील आंदोलन झालं. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांना माफी मागावी लागेल. आदित्या ठाकरे यांच्यासोबत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही ठिय्या दिला. पोलिसांकडून तुषार गांधी यांची सुटका करून घेतली, असे राऊतांनी पुढे सांगितले.